Saturday, July 27, 2024
Homeनाशिक'या' योजनेत नाशिक विभाग राज्यात अव्वल

‘या’ योजनेत नाशिक विभाग राज्यात अव्वल

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक विभागातील (Nashik Division) नाशिक, धुळे (dhule), नंदूरबार (nandurbar) व जळगाव (jalgaon) जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेत (Agricultural Mechanization Scheme) 1 एप्रिल, 2022 आतापर्यंत

- Advertisement -

एकूण 14 हजार 191 शेतकऱ्यांना (farmers) बांधवांना कृषी यांत्रीकीकरण योजनाअंतर्गत विविध कृषी यंत्र व औजारांसाठी (Agricultural machinery and tools) 75.45 कोटी अनुदान (subsidy) स्वरुपात वितरीत करण्यात आली आहे.

महा- डीबीटी (Maha- DBT) अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेत (Agricultural Mechanization Scheme) नाशिक विभाग राज्यात अव्वल ठरत आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी तथा विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ (Divisional Joint Director of Agriculture Mohan Wagh) यांनी दिली. कृषी विभागाने महा- डीबीटी पोर्टलवर “ शेतकरी योजना ” या सदराखाली शेतक-यांच्या सोयीकरिता कृषी यांत्रिकीकरण उपअभियान,

राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजने (Agricultural Mechanization and National Agricultural Development Scheme) अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण या योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासुन ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम राबविण्यास सन 2020 पासून सुरवात केलेली आहे. सन 2022-23 मध्ये या योजनेंर्गत शेतक-यांना (farmers) शेतीकामांसाठी उपयोगी असलेली विविध यंत्रे, औजारे यासाठी अनुदान देण्यात येत आहेत.

कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य

ट्रॅक्टर,पॉवर टिलर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर (हायड्रोलिक), पल्टी नांगर, ट्रॅक ट्रॉली, मिनी दाल मिल,कंम्बाईन हार्वेस्टर, रिपरकमबाईंडर (ट्रॅक्टरचलित), मिनी राईस मिल इत्यादी यंत्रे व औजारे या योजनेतून देण्यात येतात. या योजनेचा लाभ अनुसुचित जमाती, अनु.जाती, सर्वसाधारण शेतकऱ्यांना देण्यात येतो. औजारे/ यंत्रांची क्षेत्रीय तपासणी, मोका तपासणी करुन सर्व कागदपत्रे विहीत मुदतीत सादर केली असल्यास पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान वितरित करण्यात येते

सर्व प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने पारदर्शकपणे कमी वेळात पार पाडली जाते. ऑनलाईन मध्ये कोणतीही अडचण आल्यास कृषि विभागाच्या कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्यामार्फत नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा. जास्तीज जास्त शेतकऱ्यांनी कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोहन वाघ यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या