Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Election Update : त्र्यंबकला मतदान केंद्रावर राडा; पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची,...

Nashik Election Update : त्र्यंबकला मतदान केंद्रावर राडा; पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची, बंदोबस्त वाढवला

भगूरला उमेदवाराचे नाव मतदार यादीत न सापडल्याने गोंधळ

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी (Nagarparishad Election) आज (दि.२) रोजी मतदान (Voting) पार पडत आहे. सकाळच्या सत्रात उमेदवारांसह अबालवृद्धांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदान केंद्रांवर काहीशी गर्दी बघायला मिळली. मतदान झाल्यानंतर २६६ नगरसेवकांच्या आणि ११ नगराध्यक्षपदांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये आज बंद होईल. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Update : दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१.४३ टक्के मतदान; त्र्यंबकला सर्वाधिक, तर येवल्यात सर्वात कमी

YouTube video player

विविध नगरपरिषदांच्या मतदान केंद्रांवर (Voting Booth) मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. पंरतु, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) आणि भगूर येथे काही कारणांवरून गोंधळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्र्यंबकला नुतन त्र्यंबक विद्यालय येथील मतदान केंद्रावर प्रवेश करताना गेटजवळ उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी मतदारांना आमच्याकडे लक्ष राहू द्या असे सांगितले जात होते. यावेळी पोलिसांनी या उमेदवारांच्या समर्थकांना हटकले असता त्यांच्यात बाचाबाची झाली. या घटनेनंतर सध्या याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दुसरीकडे भगूर (Bhagur) येथील एका मतदान केंद्रावर शिवसेनेच्या एका उमेदवाराचे नाव मतदार यादीत सापडत नसल्याने मतदारांमध्ये आणि निवडणूक यंत्रणेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याठिकाणी शिवसेनेकडून निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या शांता गायकवाड यांचे नाव मतदारांच्या यादीत कुठेही दिसत नसल्याने हा प्रकार समोर आला.आपलेच नाव नसल्याने खुद्द उमेदवाराला या गोंधळात अडकावे लागल्याचे दिसून आले.

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी अजितदादांना करून दिली 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची...

0
मुंबई । Mumbai राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असून,...