येवला | Yeola
येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत (Yeola Nagarparishad Election) आज मतदान (Voting) प्रक्रिया पार पडत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा (Voting) हक्क बजावला.
भुजबळ कुटुंबीयांनी (Bhujbal Families) येवला शहरातील जनता विद्यालय येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या पत्नी मीनाताई भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराबाई भुजबळ, पत्नी डॉ.शेफाली भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या पत्नी विशाखा भुजबळ यांनी येवला नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान केले.
हे देखील वाचा : Nashik Election Update : साडे अकरा वाजेपर्यंत कुठल्या नगरपरिषदेत किती टक्के मतदान? आकडेवारी आली समोर
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) भाजप, रिपाई आठवले गट मित्र पक्ष येवला नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहे. नगराध्यक्षपदासाठी उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र भाऊलाल लोणारी यांच्यासह महायुतीचे २६ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याच्या केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक पार पडत आहे.




