Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Election Update : सिन्नरला मतदानाचा जोर वाढला; दुपारनंतर मतदारांची मोठी गर्दी,...

Nashik Election Update : सिन्नरला मतदानाचा जोर वाढला; दुपारनंतर मतदारांची मोठी गर्दी, ज्येष्ठही सरसावले

सिन्नर | Sinnar

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी (Nagarparishad Election) आज (दि.२) रोजी सकाळपासून मतदान प्रक्रिया पार पडत आहे. काही ठिकाणी सकाळच्या सत्रात जोरदार तर काही ठिकाणी संथ गतीने मतदान सुरु होते. मात्र, दुपारच्या सुमारास मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याने मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले.

- Advertisement -

सिन्नर नगरपरिषदेसाठी (Sinnar Nagarparishad) देखील सकाळच्या सुमारास मतदानाची टक्केवारी सहा ते सात टक्क्यापर्यंत होती. मात्र, दुपारी साडेबारा नंतर मतदानाने जोर पकडला. आता सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसत आहे. यात मतदानासाठी पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त उत्साह बघायला मिळत आहे. सिन्नरला दुपारी दीड वाजेपर्यंत ३३.२५ टक्के मतदान झाले होते. तर साडे तीन वाजेपर्यंत ४८.०३ टक्के मतदान झाले आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Election Update : दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१.४३ टक्के मतदान; त्र्यंबकला सर्वाधिक, तर येवल्यात सर्वात कमी

दरम्यान, सिन्नरला नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असून, याठिकाणी मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कस लावला आहे. तर भाजपने देखील येथे पहिल्यांदाच आपला उमेदवार (Candidate) उभा केला आहे. त्यांच्या पक्षाची सर्व मदार उदय सांगळे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमंत वाजे यांच्यावर आहे.

मतदानासाठी ज्येष्ठांचा उत्साह

नगरपरिषद निवडणुकीसाठी अनेक ज्येष्ठ विलचेअर आणि पायी चालत जाऊन मतदान करत आहेत. याशिवाय दिव्यांग लोकांचाही मतदानात चांगला सहभाग आहे. तर प्रभाग तीन मधील बुथ क्रमांक तीन आणि प्रभाग सहामध्ये मतदारांची मतदानासाठी रांग लागलेली आहे.

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...