Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Election Voting : जिल्ह्यात ११ नगरपरिषदांसाठी ६८.३४ टक्के मतदान; नगराध्यक्ष, नगरसेवकांचे...

Nashik Election Voting : जिल्ह्यात ११ नगरपरिषदांसाठी ६८.३४ टक्के मतदान; नगराध्यक्ष, नगरसेवकांचे भवितव्य EVM मध्ये बंद, २१ डिसेंबरला मतमोजणी

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी (Nagarparishad and Nagarpanchyat Election) मंगळवारी (दि. २ डिसेंबर) सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत किरकोळ वाद वगळता मतदान (Voting) प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात एकूण ६८.३४ टक्के मतदान झाले. ११ नगरपरिषदेच्या २६६ नगरसेवकपदांसाठी १.०२८ उमेदवारांचे तसेच १९ नगराध्यक्षपदांसाठी ६१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. तर काही प्रभागांची मतदान प्रक्रिया प्रलंबीत असल्याने मतमोजणी (Vote Counting) २१ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांमधील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडीसाठी ४९६ मतदान केंद्रांवर (Voting Centre) आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान घेण्यात आले. काही तुरळक घटना वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ७२ हजार ५४३ मतदारांपैकी दोन लाख ४५ हजार ६५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुका इगतपुरी, त्र्यंबकेश्का, सिन्नर, भगूर, ओडार, पिंपळगाव बसवंत, चांदवड, सटाणा, मनमाड, नांदगाव व येवल या ११ नगरपरिषदांसाठी होत आहेत. दरम्यान, सिन्नर, ओझर व चांदवड नगरपरिषदांतील एकूण सात प्रभागांमधील निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने रविवारी स्थगिती दिली आहे. त्यामुळे या सात प्रभागांसाठी आता २० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या नगरपरिषदांतील उर्वरित प्रभागांमध्ये काल (मंगळवारी) मतदान घेण्यात आले. या तीन नगरपरिषदांतील स्थगित प्रभागांसह सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींची मतमोजणी दि.२१ डिसेंबर रोजी होणार आहे.मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे २,५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या प्रक्रियेसाठी १५० वाहने नियुक्त करण्यात आली होती.

कुठे किती टक्के मतदान

येवला ७३.९१ टक्के, मनमाड ६३.६१ टक्के, सिन्नर ६७.६५ टक्के, ओझर ६२.३१ टक्के, पिंपळगाव बसवंत ७३.२१ टक्के, इगतपुरी ६८.६८ टक्के, त्र्यंबकेश्वर ८५.६६ टक्के, नांदगाव ६०.१९ टक्के, भगूर ७३.२८ टक्के, चांदवड ७४.५२ टक्के, सटाणा ६७.५४ टक्के असे एकूण सरासरी ६८.३४ टक्के मतदान झाले आहे.

सटाण्यात मतदान केंद्राजवळ वाद

सटाणा नगरपरिषद निवडनुकीदरम्यान जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळील मतदान केंद्र क्रमांक १० जवळ अन्य कारणातून अचानक दोन गटांमध्ये राडा झाला. घरगुती वादातून सुरू झालेला हा वाद मतदान केंद्राजवळ घडल्याने नागरिकांमध्ये धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने मोठा फौजफाटा आणून परिस्थिती नियंत्रणात आणली.

येवल्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत हाणामारी

येवल्यातील सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थकांमध्ये झालेल्या वादातूनही राडा उसळला. मतदान केंद्रात ये-जा करण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगवले. मतदान केंद्राबाहेर सतत तणाव निर्माण होत असल्याने पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते.

मनमाडमध्ये भाजप, शिवसेना समर्थक भिडले

मनमाडमध्ये नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिवसेना यांच्या कार्यकत्यामध्ये अचानक वाद पेटला, प्रभाग क्रमांक ११ मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवाराने आरोप केल्यानंतर दोन्ही गट भिडले. पाहता पाहता एकमेकाला आणि धक्काबुक्की झाली. या गोंधळात भाजपचे उपाध्यक्षही धक्काबुकीला सामोरे गेले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच मतदारांचीही पळापळ झाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना वेगळे केले आणि मतदान केंद्र परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.

ताज्या बातम्या

IPL 2026 : आज मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्जमध्ये लढत; कुणाची बाजू...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून,अंतिम चार मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सर्व १० संघांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू...