Saturday, June 20, 2026
HomeनाशिकNashik Fire News : इंदिरानगर परिसरात फर्निचर दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान...

Nashik Fire News : इंदिरानगर परिसरात फर्निचर दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान  

नाशिक | Nashik

शहरातील इंदिरानगर (Indiranagar) जॉगिंग ट्रॅक जवळ असलेल्या एका सोफा सेट बनविणाऱ्या फर्निचर दुकानाला (Furniture Store) आग लागल्याची घटना घटना आज (मंगळवारी) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत (Fire) लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक जवळ असलेल्या डी एस फर्निचर या नावाची सोफासेट बनविण्याचा कारखाना (Factory) आहे. या आगीत सोफासेट बनविण्याचा कारखांना पूर्णपणे जळुन खाक झाला आहे. तसेच या आगीत शेजारी असलेल्या चारचाकी वाहनांच्या गॅरेजमधील लाखो रुपयांच्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. तर कारखान्यातील स्पंज, फोम, काथ्या,रेकझीन,कापड व लाकडी साहित्य जळाले आहे.

दरम्यान, या आगीची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांना (Mumbai Naka Police) तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना देखील पाचारण करण्यात आले होते. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत तब्बल तासाभरानंतर आग आटोक्यात आणली. सदर आगीत मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

ताज्या बातम्या

NEET-UG 2026 : पेपरफुटीच्या वादानंतर उद्या नीटची फेरपरीक्षा; प्रशासन सज्ज

0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था New Delhi वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG 2026) उद्या, रविवार (२१ जून) रोजी पुन्हा घेतली जाणार...