Monday, August 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Fire News : नाशिकरोड परिसरात मॉलला आग; मॉलमधील रुग्णालयातील रुग्णांना...

Nashik Fire News : नाशिकरोड परिसरात मॉलला आग; मॉलमधील रुग्णालयातील रुग्णांना हलविले

नाशिक रोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील दुर्गा उद्यान समोर असलेल्या स्टार प्लस मॉलला (Star Plus Mall) आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण मॉल बंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर मॉलमध्ये असलेल्या रुग्णालयातील (Hospital) रुग्णांची पळापळ झाली असून, त्यांना इतर ठिकाणी हलविण्यात आले आहे. तर या आगीत संपूर्ण मॉल धुराच्या काळोख्यात सापडला आहे.

दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दलाचे (Firefighters) बंब दाखल झाले असून, याठिकाणी प्रचंड गर्दीमुळे आग विझविण्यास अडथळा येत आहे. तसेच या आगीमध्ये तीन वाहने जळून खाक झाली असून, यात एका रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे. सदरची आग ही बेसमेंटला लागली आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...