Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Fire News : पंचवटी कारंजा येथील वाड्याला भीषण आग; नागरिकांची सुखरूप...

Nashik Fire News : पंचवटी कारंजा येथील वाड्याला भीषण आग; नागरिकांची सुखरूप सुटका

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

- Advertisement -

पंचवटी कारंजा (Panchavati Karanja) येथील प्रसिद्ध माधवजिका चिवडा दुकानाच्यावर असलेल्या डॉ. जोशी यांच्या वाड्याला (Wada) सोमवारी (ता. १२) दुपारी साडेबारा वाजता भीषण आग लागली. या आगीत (Fire) कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाड्यातील घरातील वस्तू जळून खाक झाल्या.

आग लागल्याची माहिती मिळताच भाजपा (BJP) पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी यांनी तत्काळ अग्निशामक दलाला संपर्क साधला. घटनास्थळी तातडीने दोन बंब दाखल झाले आणि जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर (Fire News) नियंत्रण मिळवले.

आग लागल्याच्या दरम्यान वाड्यातील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. डॉ. जोशी यांच्या घरी कामाला असलेले रविंद्र दत्तात्रय कापुरे (वय ५४), शितल रविंद्र कापुरे (४३), दीपक दत्तात्रय कापुरे (१३), साई दत्तात्रय कापुरे (९) आणि काजल रविंद्र कापुरे (११) या कुटुंबातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, आगीच्या घटनेत पंचवटीतील माजी नगरसेवक उल्हास धनवटे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी, किशोर ढगे, दिलीप सातपुते, बंटी वाघ, प्रवीण भाटे, उमेश कोठुळे आणि संजय शिंदे यांनी धाडसाने मदत कार्य केले. तर  प्राथमिक तपासात आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत वाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जीवितहानी टळल्याने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...