मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
भूखंड विक्रीच्या व्यवहारात (Plot Sale Transaction) एका महिलेची दोन कोटी तेरा लाखाची फसवणूक (Fraud) करणाऱ्या पाच जणांविरुद्ध छावणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील कॅम्प रोड, बारा बंगला भागात राहणाऱ्या संजाली मदनलाल जाजू (५४) या महिलेने छावणी पोलीस ठाण्यात (Cantonment Police Station) दाखल केलेल्या फिर्यादीत कॅम्प रोडवरील संकुलणात आपल्या मालकीचा भूखंड वासू प्रकाश शिर्के, कुणाल कैलास सूर्यवंशी, कुंदन कृष्णा बोरसे,संदीप सोमनाथ हिरे व शकील अहमद नजीर अहमद या पाच जणांना दोन कोटी ४१ लाख रुपयांना जुलै २०२२ मध्ये विकला होता. खरेदीखत नोंदविताना या पाच जणांनी २८ लाख रुपये दिले होते व उर्वरित रक्कम मोठी असल्याने घरी आणून देण्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप पावतो दोन कोटी तेरा लाखाची रक्कम संबंधितांनी आणून दिलेली नाही.
दरम्यान,या पैशांची (Money) मागणी केली असता पाच जणांनी शिवीगाळ व दमबाजी करत आता पैसे देण्यास नकार दिला आहे. भूखंड विक्री व्यवहारात या पाच जणांनी आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीत जाजू यांनी नमूद केले असल्याने पोलिसांनी वासू शिर्केंसह पाच जणांविरुद्ध फसवणूकचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक दीपक जाधव हे अधिक तपास करीत आहे.