Thursday, July 9, 2026
Homeक्राईमNashik Fraud : पोस्ट खात्याला चुना! सायबर चोरांनी लांबवले १४ लाख

Nashik Fraud : पोस्ट खात्याला चुना! सायबर चोरांनी लांबवले १४ लाख

कार्यालयांतील दोन एटीएममधून १७६ बनावट व्यवहार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गर्भश्रीमंतासह सामान्यांना आर्थिक गंडा घालणाऱ्या काही सायबर संशयितांनी (Cyber Theives) आता थेट भारतीय पोस्ट खात्यालाच (Indian Post Account) चुना लावला आहे. बनावट एटीएम कार्डद्वारे या चोरट्यांनी पोस्टाच्या एटीएम सेंटरमधून बचत खात्यातील तब्बल १४ लाख दहा हजार रुपये लांबविले आहेत.

- Advertisement -

शहरातील गंजमाळ (Ganjmal) येथील जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) आणि नाशिकरोड येथील हेड पोस्ट ऑफिसमधील दोन एटीएम मशिनमधून परस्पर हे पैसे काढून घेण्यात आले. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) अनोळखी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड (Nashik Road) येथील पोस्ट ऑफिसमधील गजेंद्र भालचंद्र भुसारे (रा. प्रभू आळी ता. श्रीवर्धन, जि. रायगड) यांच्या फिर्यादीनुसार संशयितांनी २६ डिसेंबर २०१९ ते १३ जानेवारी २०२१ या कालावधीत नाशिक रोड हेड पोस्ट ऑफिस येथील एटीएम मशिनमधून वीस वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम कार्डद्वारे १२४ बनावट ट्रान्झेक्शन करत दहा लाख वीस हजार रुपये काढून घेतले.

तर, गंजमाळ येथील जनरल पोस्ट ऑफिस येथील एटीएममधूनही (ATM) ११ बँकांच्या बनावट एटीएम कार्डद्वारे ५२ बनावट ट्रान्झेक्शन करुन तीन लाख ९१ हजार रुपये काढून घेतले आहेत. अशा पद्धतीने माहितगार संशयिताने (Suspect) एकूण १७६ बनावट आर्थिक व्यवहार करुन १४ लाख ११ हजार रुपये काढून नेले आहेत. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे तपास करत आहेत.

नाशिकमधील पहिलीच फसवणूक

एटीएम कार्ड (ATM Card) बनावट असले तरी त्यावरील डेबिट व सीव्हीव्ही नंबर संबंधित बँक अपडेट करते. त्यासोबतच गोपनीय धोरणानुसार पिन नंबर ग्राहकालाच पुरविते. त्यामुळे या प्रकरणात २० हुन अधिक एटीएम कार्डचा फक्त पोस्टाच्याच एटीएम मशिनमध्ये वापर करण्यात आला आहे. ही व अन्य काही बाबी संशयास्पद असून हे कार्ड कुठून उपलब्ध झाले? आर्थिक व्यवहार करताना संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला का? याचा तपास होणार आहे. प्रकरणात माहितगाराने हा घोटाळा केल्याचा संशय असून नाशकात अशा स्वरुपाची ही पहिलीच घटना आहे.

दृष्टीक्षेपातून

  • अनेक बचत खाते, पोस्टाच्या खात्यातून पैसे वर्ग
  • बनावट एटीएम कार्डचा वापर
  • हिशेबादरम्यान घोळ उघड
  • व्यवहार करणारा संशयित सायबर एक्सपर्ट
  • बनावट एटीएम कार्ड बनविणाऱ्याचा शोध
  • सर्वच आर्थिक व्यवहारांची पडताळणी होणार

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरण 65 टक्के भरले; निळवंडेत ‘एवढा’ पाणीसाठा

0
अतिवृष्टीमुळे भातरोपे, बांधांचे प्रचंड नुकसान, पंचनाम्याची मागणी भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव केल्याने धरणात वेगाने नवीन...