Tuesday, October 22, 2024
HomeनाशिकNashik Fraud News : मोबाईलचा ॲक्सेस मिळवून सेवानिवृत्तास १९ लाखांना गंडा

Nashik Fraud News : मोबाईलचा ॲक्सेस मिळवून सेवानिवृत्तास १९ लाखांना गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राष्ट्रीयीकृत बँकेच्या क्रेडीट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याने भासवून सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) याच बँकेच्या एका खातेदारास (Account Holder) लिंक पाठवून त्याद्वारे त्याच्या मोबाईलचा (Mobile) संपूर्ण ॲक्सेस मिळवून तब्बल १९ लाख रुपये लाटले आहेत. या घटनेनंतर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) अनोळखी संशयितांसह व्हाटस्ॲपधारकांवर गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार सेवानिवृत्त (Pensioner) असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : ‘होम अरेस्ट’ला अटकाव; मोबाईलमध्ये फीचर

शहरातील एक तक्रारदार घरी असताना, त्याला सायबर चोरट्यांनी २७ आणि २८ सप्टेंबर २०२४ ला ९८८३८१२८८२ या मोबाईलवरुन संपर्क साधत पंजाब नॅशनल बँकेच्या क्रेडीट कार्ड डिव्हिजनमधून बोलत असल्याचे भासविले. तुमचे क्रेडीट कार्डचे अपडेशन संपत आहे. तसे न केल्यास दरमहा दंड आकारला जाईल असे सांगितले. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच नवीन क्रेडीट कार्डची (Credit Card) प्रोसेस करावी लागेल.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दामदुपट्ट आमिषाने २०० कोटींचा गंडा

त्यासाठी मी जे डॉक्युमेंट, लिंक पाठवले ती चेक करुन घ्या असे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर क्रेडीट कार्ड ॲप्लिकेशन करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून याच लिंकमार्फत पीएनबी क्रेडिट कार्ड नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड (Download) करण्यास भाग पाडले. याचवेळी संशयिताने तक्रारदाराच्या मोबाईलचा थेट ॲक्सेस मिळवून पाहिजे तसे परस्पर आर्थिक व्यवहार (Financial Transactions) केले. तपास सुभाष ढवळे करत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंग आणि वर्क फ्रॉमचे आमिष दाखवून ३७ लाख उकळले

पाच लाख रुपये परत

ऑनलाईन बँकिंगमार्फत सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या पीएनबी बचत खाते क्रमांक ८९२८०००२००००००१२ वरुन २३ लाख ६५ हजार रुपये व पंजाब नॅशनल बँकेच्या पेंशन खाते क्रमांक ३७६२०००३००१२२१२१ वरुन ८२ हजार असे एकूण २४ लाख ४७ हजार रुपये इतर संशयास्पद बँक खात्यात वर्ग केले. तर काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे हॅकरने २३ लाख रुपयांपैकी ५ लाख रुपये तक्रारदाराच्या बँक खात्यात (Bank Account) परत पाठवले. त्यामुळे प्रकरणात १९ लाख रुपये उकळून संशयिताने संपर्क नंबर बंद केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या