Sunday, May 11, 2025
Homeक्राईमNashik Fraud News : ऑनलाईन नंबर शोधताना गंडा; डॉक्टरचे सोळा लाख रुपये...

Nashik Fraud News : ऑनलाईन नंबर शोधताना गंडा; डॉक्टरचे सोळा लाख रुपये उकळले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पत्नीचे बँक खाते (Bank Account) दुसऱ्या शाखेत वर्ग करण्यासाठी ऑनलाईन (Online) सर्च इंजिनवरुन बँकेच्या ‘शाखा व्यवस्थापका’चा नंबर शोधण्याच्या नादात डॉक्टरला सायबर चोरट्यांनी १६ लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत संबंधित मोबाईल नंबरसह ज्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले, त्या खातेदाराविरुद्ध नाशिक शहर सायबर पोलिसांत (Nashik City Cyber Police) आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

वडाळा रोडवरील (Wadala Road) खोडेनगर भागातील सॉलिटिएअर इमारतीजवळ ६४ वर्षीय डॉक्टर हे पत्नीसह वास्तव्यास आहेत. दरम्यान, त्यांच्या पत्नीचे बँक खाते धुळे जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देवपूर शाखेत सुरु आहे. मात्र, त्यांना हे खाते देवपूर येथून नाशिकमधील (Nashik) शिवाजीनगर स्टेट बँकेच्या शाखेत वर्ग करुन सुरु करायचे होते. त्यासाठी डॉक्टरांनी २ आणि ३ मे २०२५ रोजी मोबाईलवरुन ऑनलाइन पद्धतीने माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यात बँक खाते वर्ग करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांनी ‘गूगल क्रोम’ सर्च इंजिनवरुन देवपूरच्या एसबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचा नंबर मिळविला.

यानंतर ९३६५०६०३६६ हा नंबर मिळाल्यावर त्यांनी कॉल करुन बैंक खाते वर्ग करण्याची पद्धती विचारली. तेव्हा वरील नंबरवरुन बोलणाऱ्या अनोळखी संशयिताने देवपूर एसबीआय शाखेचा (SBI Branch) व्यवस्थापक असल्याचे भासवून त्यांच्याकडून बँक खात्याची संपूर्ण माहिती मिळविली.डॉक्टरांना प्रोसेस समजावून सांगतानाच संशयिताने बँक खाते ऑनलाइन पद्धतीने वर्ग करण्यास काही स्टेप असल्याचे सांगून मिळविलेल्या माहितीच्या आधारे डॉक्टरांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर काही ओटीपी (वन टाईम पासवर्ड) पाठविले.

दरम्यान, डॉक्टरांकडून हे ओटीपी (OTP) मिळवून त्यांच्या बँक खात्यातून थेट १६ लाख ६४ हजार ९९९ रुपये दुसऱ्या बँक खात्यांत वर्ग केले. बँक खात्यातून पैसे इतरत्र ‘क्रेडीट’ झाल्याचे कळताच डॉक्टरांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी यानंतर बँक व सायबर पोलीस ठाणे गाठून प्रकाराची माहिती दिली. तेव्हा त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार आता गुन्हा नोंद होऊन तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे करत आहेत.

बँक खाते सोडा, पैसे झाले वर्ग

या प्रकरणात डॉक्टरांना पत्नीचे बँक खाते दुसऱ्या बँक खात्यात वर्ग करावयाचे होते. मात्र त्यांनी थेट जवळील बँकेत न जाता ऑनलाइन पद्धतीने बँक मॅनेजरचा संपर्क नंबर शोधून कॉल केला. त्यामुळे बँक खाते वर्ग होण्याआधीच सायबर चोरट्यांनी लक्ष करत त्यांचे बँक खात्यातील रक्कम वर्ग करून गंडा घातला आहे. त्यामुळे डॉक्टरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुद्दे

* ऑनलाईन नंबर सर्च करताना खात्री करावी.
* वयोवृद्धांनी शक्यतो बँकेत प्रत्यक्ष जाऊन समस्येचे निराकरण करावे.
* कोणतेही ओटीपी, सीव्हीही, पासवर्ड इतरत्र शेअर करु नये.
* सर्च इंजिनवर सर्वच नंबर खात्रीलायक नसतात.
* कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करु नये.
* कोणताही बँक पासवर्ड बँक खाते व केवायसीसाठी फोन करत नाही

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : मद्यपी, टवाळखोरांवर दंडुका; परिमंडळ एक आणि दोनमध्ये ६८२...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहर पोलिसांच्या (City Police) परिमंडळ एक आणि दोनच्या (Zone One and Two) हद्दीतील विविध चौकांसह मद्य दुकाने व पानटपरींजवळ घोळका...