Wednesday, January 15, 2025
Homeक्राईमNashik Fraud News : बनावट नियुक्तीपत्र देऊन आठ लाखांचा गंडा

Nashik Fraud News : बनावट नियुक्तीपत्र देऊन आठ लाखांचा गंडा

फसवणाऱ्या एजंटांची साखळी कार्यरत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुलाच्या शासकीय नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या बापास तिघा ठकबाजांनी बनावट जॉईनिंग लेटर देऊन ८ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला. ‘जॉइनिंग लेटा’ हाती असतानाही हजर होण्याचा निरोप सात महिने उलटूनही मिळत नसल्याने ही फसवणूक (Fraud) उघड झाली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय व सीबीएस भागात गरजूंना हेरुन त्यांची फसवणूक करणाऱ्या कथित एजंटांची साखळी कार्यरत असल्याचे या प्रकरणामुळे समोर आले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Rain Update News : ‘फेंगल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका; ‘या’ जिल्ह्यांत पाऊस कोसळण्याचा अंदाज

हेमराज गंगाराम गायकवाड (वय ४८, रा. ताहाराबाद, ता. चागलाण, जि. नाशिक) यांनी या प्रकरणी संशयित ठकबाज बाळू दादा जाधव (रा. दुङगाव ता. जि. नाशिक), मुन्ना सोन्या कुंबर आणि शरद दत्तात्रय राजगुरु उर्फ पाटील यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिसांत (Sarkarwada Police) फिर्याद नोंदवली आहे. हेमराज हे आश्रम शाळेत कामाठी पदीवर कार्यरत असून त्यांच्या मुलाने एमएसडब्लूसह डी. एडपर्यंत शिक्षण केले आहे. परंतु, सर्वत्र प्रयत्न करुनही लिपीक, टंकलेखक व अन्य शासकीय पदांवर नोकरी मिळत नसल्याने हेमराज हे मुलाच्या (Son) नोकरीसाठी विविध ठिकाणी शोध घेत होते.

हे देखील वाचा : Nashik News : तापमान ११.५ अंशांवर

दरम्यान, १२ सप्टेंबर २०२३ ला ते शहरातील सीबीएस येथे आले असता वरील संशयितांशी (Suspected) त्यांची ओळख झाली. त्यानंतर हेमराज यांनी ‘मुलाला शासकीय नोकरी मिळावी हा विषय संशयितांकडे मांडला. तेव्हा संशयितांनी संधी साधून ‘आमची अनेक शासकीय कार्यालयांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख आहे. आम्हाला सर्वच टेबलचा अनुभव आहे. तुमच्या मुलास नोकरी लागेल, पण त्यासाठी १२ ते १३ लाखांचा खर्च लागेल. हा खर्च विविध आस्थापना, टेबल, बरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याशिवाय काम फत्ते होणार नाही, असा विश्वास दाखवला.

हे देखील वाचा : Nashik Police News : पोलिसांची संवेदनशीलता आणि सतर्कता

त्यानंतर मुलाला पाच आकडी पगाराची नोकरी लागेल, या आशेने हेमराज यांनी तडजोडीअंती व्यवहार फायनल करून होकार दर्शवला.नंतर, तिघाही संशयितांनी संगनमत करून हेमराज यांच्या मुलाची लिपीक-टंकलेखक पदावर निवड झाली आहे, असे सांगून मुंबईतील जे.जे.रूग्णालयातील वैद्यकीय तपासणीचे पत्र दिले. त्यामुळे हेमराज यांचा विश्वास बसल्याने त्यांनी संशयितांनी सांगितलेल्या ‘गूगल आणि फोन पे’ नंबरवरील बँक खात्यांवर वेगवेगळ्या कालावधीत ५ लाख रुपये पाठवले. तसेच रोख ३ लाख रुपये दिले यानंतर संशयितांनी सिन्नर तहसील कार्यालयात लिपीक-टंकलेखकपदावर नियुक्तीचे पत्र (ऑर्डर) हेमराज यांनी दिले. या नियुक्तीपत्रावर उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा जावक क्रमांक, तारीख, आस्थापना, उपजिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी, कार्यालयाचा स्टेप असलेली खोटी व बनावट ऑर्डर (False and Forged Orders) दिली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दुहेरी खुनाचा उलगडा

तिघांचा शोध सुरु

प्रकरणातील तिघे संशयित जिल्हाधिकारी कार्यालय, सीबीएस व विविध तहसील कार्यालयांत वावरताना अनेकदा आढळले आहेत. ‘आमची ओळख वरिष्ठांशी आहे, तुमचे कोणतेही काम करुन देतो’ असे सांगून बनावट कागदपत्रे देऊन गंडा घालतात, असा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार तिघांचा शोध सुरु असून त्यांनी यापूर्वी अनेकांना नोकरीसाठी गंडा घातल्याची शक्यता आहे. तपास सहायक निरीक्षक सुखदेव काळे करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या