Thursday, October 22, 2026
HomeनाशिकNashik Ganesh Visarjan Miraunuk: विसर्जन मिरवणुकीवर भद्रकालीचाच प्रभाव !२५ पैकी तब्बल १५...

Nashik Ganesh Visarjan Miraunuk: विसर्जन मिरवणुकीवर भद्रकालीचाच प्रभाव !२५ पैकी तब्बल १५ मंडळे;यंदा एका नवीन मंडळाचा समावेश

नाशिक | प्रतिनिधी
श्री गणेश विसर्जन मुख्य मिरवणूकी च्या नियोजनाची आणि क्रमाची अधिकृत यादी जाहीर झाली असून, या यादीवरून यंदाच्या मिरवणुकीचे वेगळे वैशिष्ट्य समोर आले आहे. शहरातील चार मुख्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून निघणाऱ्या एकूण २५ गणेश मंडळांपैकी तब्बल १५ मंडळे ही एकट्या भद्रकाली पो लीस ठाण्याच्या हद्दीतील आ हेत. त्यामुळे यंदाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीवर भद्रकाली परिसरातील मंडळांचाच प्रभाव आणि वर्चस्व पाहायला मिळणार आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या मानाच्या पहिल्या रथापासून सुरू होणाऱ्या या मिरवणुकीत भद्रकालीव्यतिरिक्त सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४, मुंबई नाका हद्दीतील ३ आणि पंचवटी हद्दीतील ३ मंडळे सहभागी होत आहेत. सर्वाधिक मंडळे (१५) एकाच म्हणजे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने, मिरवणूक मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भद्रकाली पोलिसांसह होमगार्ड्सने नियोजन केले आहे. भद्रकाली परिसर, जुने नाशिक आणि सराफ बाजार या संवेदनशील मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिरवणुकीतील मंडळांचा क्रम
१. नाशिक महानगर पालिका (मानाचा शासकीय रथ), २. रविवारी कारंजा मित्र मंडळ, ३. गुलालवाडी व्यायाम शाळा, सोमवार पेठ, ४. भद्रकाली कारंजा मित्र मंडळ साक्षी गणेश, ५. श्रीमान सत्यवादी मित्र मंडळ, पेठरोड पंचवटी, ६. सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्र मंडळ (नाशिकचा राजा), ७. सरदार चौक मित्र मंडळ, पंचवटी, ८. श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळ, ९. रोकडोबा मित्र मंडळ, नाव दरवाजा, १०. शिवसेवा युवक मित्र मंडळ, गाडगे महाराज पुतळा, ११. शिवमुद्रा मित्र मंडळ, (मानाचा राजा), १२. युवक मित्र मंडळ, मुंबई नाका, १३. दंडे हनुमान मित्र मंडळ, काजीपुरा चौक, १४. युनायटेड फ्रेंड्स सर्कल, संदिप हॉटेल समोर, १५. श्री शनेश्वर युवक समिती, चौक मंडई, १६. नेहरूचौक मित्र मंडळ, पिंपळपार, १७. वेलकम सहकार्य मित्र मंडळ, १८. गजानन मित्र मंडळ, १९. महालक्ष्मी चाळ सोशल फाउंडेशन, २०. शिवस्य जनसेवा समिती, बुरुड गल्ली, २१. भोई मित्र मंडळ, भोई गल्ली, कथडा, २२. नवक्रांती मित्र मंडळ, काठे गल्ली, २३. विनय नगर मित्र मंडळ, विनय नगर, २४. श्री तिळभांडेश्वर मित्र मंडळ, सराफ बाजार, २५. हिंदू एकता आंदोलन पक्ष, द्वारका.

देशदूतच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध श्रेयसची परीक्षा; आजपासून टी-२० मालिका

0
नवी दिल्ली | New Delhi न्यूझीलंडविरुद्धच्या ( New Zealand) आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना कर्णधार श्रेयस अय्यरसमोर गोलंदाजीच्या समस्या सोडवण्याचे मोठे...