Tuesday, September 15, 2026
HomeनाशिकGaneshotsav 2026 : विसर्जन मिरवणुकीच्या शिस्तीला सर्वाधिक गुण! नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांनाच मिळणार...

Ganeshotsav 2026 : विसर्जन मिरवणुकीच्या शिस्तीला सर्वाधिक गुण! नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांनाच मिळणार मानाची पारितोषिके

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात गर्दीचे नियंत्रण, ध्वनीप्रदूषण आणि विसर्जन मिरवणुकांचा विलंब या समस्यांवर मात करण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने (Nashik City Police Commissionerate) यंदा एक विशेष रणनीती आखली आहे. केवळ उत्सव साजरा करणाऱ्या नव्हे, तर कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शिस्तीचे काटेकोर पालन करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ जाहीर करण्यात आली आहे. १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या उत्सवात शहरात शांतता व सुव्यवस्था राखणाऱ्या उत्कृष्ट मंडळांना विशेष पारितोषिकांनी गौरवले जाणार आहे.  

- Advertisement -

यंदा पोलिसांचा (Police) मुख्य भर विसर्जन मिरवणुकीतील शिस्त आणि वेळेच्या नियोजनावर असणार आहे. १०० गुणांच्या या मूल्यांकनात तब्बल ४५ गुण हे केवळ विसर्जन मिरवणुकीतील वर्तणुकीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मिरवणुकीत पडणारा खंड टाळणे, दोन मंडळांमध्ये अंतर राहू न देणे, वेळेत हजर राहून ठरलेल्या वेळेत विसर्जन पूर्ण करणे यासाठी विशेष गुण दिले जातील. डीजे आणि कर्णकर्कश आवाजाऐवजी पारंपरिक वाद्यांचा शिस्तबद्ध वापर आणि गुलालाचा नियंत्रित वापर करणाऱ्या मंडळांना झुकते माप मिळणार आहे. विसर्जन मार्गावरील धार्मिक स्थळे, रुग्णालये आणि संवेदनशील ठिकाणी दाखवलेली सामाजिक प्रगल्भता आणि वाहतूक शिस्त गुणांकनासाठी निर्णायक ठरणार आहे.  

डायल ११२ अन् अमली पदार्थ विरोधी मोहिम

​गणेश स्थापनेपासून विसर्जनपूर्व कालावधीसाठी ५५ गुण निश्चित करण्यात आले आहेत. यात केवळ पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट किंवा सीसीटीव्ही व्यवस्था एवढ्यावरच न थांबता, सामाजिक जनजागृतीला स्थान देण्यात आले आहे. ‘डायल ११२’ या आपत्कालीन हेल्पलाइनचा प्रचार, अमली पदार्थ विरोधी मोहीम तसेच महिला व बालकांची सुरक्षा या तीन महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी जनजागृती करणाऱ्या मंडळांना प्रत्येकी १० गुण (एकूण ३० गुण) दिले जाणार आहेत. रक्तदान शिबिरे, अंधश्रद्धा निर्मूलन, जलसंवर्धन, गडकिल्ले रक्षण आणि मुलींचे संरक्षण या विषयांवर आधारित देखाव्यांना विशेष गुण मिळतील.  

१६ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी

​परिमंडळ-१ आणि परिमंडळ-२ मधील अधिकृत परवानगी घेतलेल्या मंडळांसाठी ही स्पर्धा खुली आहे. प्रत्येक परिमंडळातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ अशी एकूण १० सर्वोत्कृष्ट मंडळे निवडली जातील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी https://nashikcitypolice.gov.in/GanapatiAwardForm या अधिकृत लिंकवर जाऊन १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. 

ताज्या बातम्या

सोशल

Crime Story: सोशल मीडियावरील वन क्लिकचं जाळं अन् दोन ज्येष्ठ नागरिकांना...

0
नाशिक | प्रतिनिधीमोठ्या परताव्याचे आमिष आणि सोशल मीडियावरील वन क्लिक जाळे... फसवणुकीच्या या दोन भिन्न क्लुप्त्यांचा वापर करून चोरट्यांनी जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांना तब्बल...