Sunday, February 16, 2025
Homeमुख्य बातम्याDev Dya Devpan Ghya : मूर्तीदानाचे सर्व विक्रम मोडीत; तब्बल 'इतक्या' मूर्तींचे...

Dev Dya Devpan Ghya : मूर्तीदानाचे सर्व विक्रम मोडीत; तब्बल ‘इतक्या’ मूर्तींचे संकलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देव द्या, देवपण घ्या उपक्रमांत यापूर्वीचे मूर्तीदानाचे सर्व विक्रम मोडीत काढून नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याची माहिती संयोजक आकाश पगार (Akash Pagar) यांनी दिली आहे. यंदा सुमारे ६,५०० गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे…

- Advertisement -

गोदावरी नदीला प्रदुषणापासुन वाचविण्यासाठी १३ वर्षांपूर्वी मुर्ती व निर्माल्य दान करण्यासाठीचा देव द्या, देवपण घ्या हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. यानिमित्ताने प्लॅस्टर ॲाफ पॅरिसच्या लाखो मुर्तींचे दान नाशिककरांकडुन करण्यात येत असुन १३ वर्षांपूर्वी लावलेले देव द्या, देवपण घ्या ! चे छोटेसे रोपटे फोफावत जाऊन अवघ्या महाराष्ट्रात त्यांचे अनुकरण होत असल्याचे दिसत आहे.

गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. गणेशभक्तांना आरती करण्याची व्यवस्था देखील यावेळी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

Gautami Patil : गौतमी पाटीलवर नगरमध्ये गुन्हा दाखल; काय आहे कारण?

पिवळ्या रंगाचे आकर्षक कुर्ता घातलेले कार्यकर्ते नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, वैष्णवी जोशी, राहुल मकवाना, भाग्यश्री जाधव, जयंत सोनवणे, गौरी घाटोळ, संदिप आहिरे, संकेत निमसे, हर्षिता माळी, तुषार गायकवाड, प्रणाली शिंदे, सोनू जाधव, रोहित कळमकर, गीतांजली पवार, कोमल कुरकुरे, भावेश पवार, शुभम पगार, सोनिया पगार, श्रेया सोनवणे, ललित पिंगळे, किर्ती निरगुडे, सुजित सोनवणे, कावेरी कोल्हे, अविनाश बरबडे, रुपाली लासुरे, अक्षय नेर, रोशनी शिंदे, वैभव बारहाते, साक्षी तिडके, अमोल भांड, अवंती गायकवाड, हेमांगी शिंदे, महेश मंडाले, गायत्री पाटील, कुणाल सानप, आदिती फड, सागर कुलकर्णी, नयन पवार, नितीन पाटणकर, हिमांशु पगार, ओम निकम, मदन म्हैसधुणे, मयूर पवार, योगेश निमसे, आकाश खरे, निशांत शिंदे, राहुल घोडे, उमेश पवार, निखील व्यव्हारे, जितेंद्र देवरे, गिरीष ढिरेंगे, आशुतोष देवरे, रुषिकेश गौर्डे, धिरज बच्छाव, अभिषेक भोसले, शुभम जाधव, बादल मोहिते, अश्विन बोडके, चेतन आहिरे, मनोज पगार, मयुर गुंजाळ, प्रज्वल पाटील, राहुल आपसुंदे, अधिराज मोरे, संतोष शिंदे, आकाश सानप, प्रभाकर आढाव, पंकज देवरे, सुशिल डोंगरे, राहुल साठे, वैभव भालेराव, सौरभ वरपे, जयेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : बापानेच दिली मुलाला मारण्याची सुपारी; 70 हजारांत दोघांनी केला खून

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या