Sunday, September 22, 2024
HomeनगरSatyajeet Tambe : सत्यजीत तांबेंचा मार्ग मोकळा? विखेंची यंत्रणा लागली कामाला

Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंचा मार्ग मोकळा? विखेंची यंत्रणा लागली कामाला

राहाता | Rahata

- Advertisement -

विधान परिषदेच्या (MLC Election 2023) पाच जागांसाठी निवडणूक होत असून, नाशिक पदवीधर मतदारसंघात (nashik graduate constituency) काय घडलंय? आणि त्यामुळे काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडीतील (MahaVikas aghadi) राजकारण कसं ढवळून निघालं, हे सगळ्यांनीच पाहिलं. मात्र, या सगळ्यात सर्वांच्या नजरा होत्या, त्या भाजपकडे (BJP).

‘मामा’ रुग्णालयात असतांना फडणवीसांनी केले काँग्रेसमधील ‘ऑपरेशन’

अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या सत्यजित तांबेंनी (Satyajeet Tambe) ना भाजपला पाठिंबा मागितलाय. ना भाजपने सत्यजित तांबेंना जाहीरपणे पाठिंबा दिलाय. मात्र, आता भाजप नेमकं कुणाच्या बाजूने असणार आहेत, याचे संकेत मिळत आहेत. सत्यजीत तांबे यांना अप्रत्यक्षपणे भाजपकडून पाठिंबा देण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळातून होऊ लागल्या आहेत. विशेष बाब म्हणजे विखे पाटील (Vikhe Patil) यांच्या समर्थकांनीच सोशल मीडियावर स्टेस्टस ठेवत तांबे यांचा प्रचार सुरु केला आहे.

“राजा का बेटा राजा नही बनेगा” म्हणत, सत्यजीत तांबेंच टेन्शन वाढवणाऱ्या शुभांगी पाटील आहेत तरी कोण?

विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना सुजय विखे (and Sujay Vikhe Patil) म्हणाले की, पाठिंब्याबाबत पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही मात्र आम्ही आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही. हे स्पष्ट आहे. आम्ही भूमिपुत्र म्हणजेच जिल्ह्यातील उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवाराला पाठिंबा का द्यावा? अशी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याने त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष आणि फडणवीसांना सांगणार आहोत. पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे जिल्ह्याला जर चांगली संधी मिळत असेल तर त्याचं सोनं केलं जाईल असे सूचक वक्तव्य करत सुजय विखे पाटील यांनी सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभं राहण्याचे सुतोवाच केलं होतं.

नाशिक पदवीधरचा निकाल नगर जिल्हा ठरवणार?, वाचा काय सांगते आकडेवारी…

सुरुवातीपासून नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे चर्चेत होते. सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र सुधीर तांबे (Sudheer Tambe) यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यांनतर सत्यजित यांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेसकडून दोघांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली. सत्यजित यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला पाठिंबा जाहीर करावा असे आवाहन केले होते.

सत्यजित तांबे काँग्रेसचा हात सोडणार?

दरम्यान पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर (voting center) मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे (documents) पुरावा म्हणून ग्राह्य राहणार आहे, असे निवडणूक आयोगाने (Election Commission) कळविले आहे.

आधार कार्ड (Aadhar Card), वाहन चालक परवाना (driving license), पॅन कार्ड (pan card), भारतीय पारपत्र, केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, खासदार (MLA)/आमदार (MP) यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मुळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (Unique Disability Identity Card) इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या