Saturday, September 14, 2024
Homeनाशिक'त्या' निर्णयाने हॉटेल व्यावसायिक खुश, पण !

‘त्या’ निर्णयाने हॉटेल व्यावसायिक खुश, पण !

नाशिक | Nashik

- Advertisement -

येत्या १५ ऑगस्ट पासुन रात्री दहा पर्यंत हॉटेेल रेस्टॉरंटला (Hotel Restaurant) राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्या निर्णयाचे नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांनी (Hotelier) स्वागत केले आहे.

मात्र पुणे (Pune), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) व नागपुरला (Nagpur) ज्याप्रमाणे रात्री दहा ते अकरा पार्सल सेवेेला परवानगी दिली. तशीची परवानगी नाशिकलाही द्यावी, अशी मागर्णी हॉटेल व्यावसायिकांंनी केली आहे.

राज्य सरकार ज्या प्रमाणे निर्बंध शिथीलते बाबत निर्णय घेेईल. त्याप्रमणे नाशिक जिल्ह्यातही (Nashik District) आदेश लागु होतील, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी गेल्या आठवड्यातच स्पष्ट केले होते. त्यामुळे रात्री दहापर्यंंत हॉटेल सुरु करण्याचा निर्णय राज्य स्तरावरुन झाल्यास त्यांची अंंमलबजावणी नाशिक जिल्ह्यातही होणार आहे.

मात्र नाशिक महानगरापुरता वेगळा निर्णय घ्यावयाचा असल्यास तो महापालिका आयुक्तांंनी (NMC Commissioner) घेतला पाहीजे, अशी हॉटेल चालकांची मागणी आहे. कारण नागपुर, पुण्यात तेथील महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र आदेश काढला आहे. त्यामुळे रात्री दहा नंतर पार्सल सेवेला परवानगी दिली आहेे, असे हॉटेल रेस्टॉरंटस अ‍ॅण्ड बर असोसिएशनचेे अध्यक्ष संंजय चव्हाण यांनी सांगितले. त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujabal) यांनाही साकडे घाालण्यात आले आहे.

अंमलबजावणीसाठी अजुन चार तीन दिवस बाकी आहे. शुक्रवारी पालकमंत्री साप्ताहिक आढावा बैठक घेतील. त्यांनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या