Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक : गणपती विसर्जन मिरवणुकांना उदंड प्रतिसाद, 'पाहा' व्हिडीओ

नाशिक : गणपती विसर्जन मिरवणुकांना उदंड प्रतिसाद, ‘पाहा’ व्हिडीओ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह काही वेगळाच दिसून आला. घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही उत्साह दिसून आला. बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाचा निरोप देण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

- Advertisement -

नाशिक शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत २४ गणेश मंडळे सहभागी झाली. नाशिकरांनी दोन वर्षांनंतर बाप्पाचे ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला. अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरी कोसळत होत्या. तरीही नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण शहर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात दुमदुमले होते. तर विसर्जनावेळी अनेकांनी साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला, पाहा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या