Friday, May 31, 2024
Homeधुळेनाशिकच्या आयकर विभागाची भिक्षुकाकडे धाड

नाशिकच्या आयकर विभागाची भिक्षुकाकडे धाड

सोनगीर/वार्ताहर

येथील एक व्यापारी व एका भिक्षुकी ब्राम्हणाकडे नाशिक आयकर विभागाने धाड टाकली आहे. यासंदर्भात आयकर अधिकारींनी भेटण्यास तसेच माहिती देण्यास नकार दिल्याने नेमके काय घडले हे समजू शकले नाही.

- Advertisement -

काल दुपारी व्यापारी प्रमोद डेरेे व अमोल जोशी यांचेकडे आयकर विभागाने धाड टाकल्याची गावात चर्चा आहे. यासंदर्भात चर्चेतून मिळालेली माहिती अशी की सरवड शिवारात खानदेश केमिकल्सजवळ शेती खरेदी विक्री व्यवहार दोघांमध्ये झाला. डेरे यांनी जोशी यांना एक कोटी 30 लाखाला शेत विकले. ते पुन्हा डेरे यांनी परत घेण्यासाठी एक कोटी 65 लाख रुपये दिले. मात्र तो सौदा फिसकटला. जोशींनी डेरेंना रक्कम परत दिली. मात्र मोजतांना 56 लाख रुपये कमी भरले अशी डेरेंची तक्रार आहे. रक्कम बरोबर दिले असे जोशींचे म्हणणे असल्याचे समजते. एवढ्या मोठ्या रकमेच्या व्यवहाराबाबत चौकशी करण्यासाठी आयकर अधिकारी आले असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात आयकर अधिकारींनी भेटण्यास नकार दिल्याने नेमका तपशील समजू शकला नाही. मात्र स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असल्याचे व पोलीसांनी आयकर विभागाला कळविले अशीही माहिती मिळाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या