नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या २४ फेब्रुवारीपासूनच नाशिकचे (Nashik) कमाल तापमान (Temperature) ३४ अंशांवर गेले असून रोज ३५ अंशांवरच तापमान कायम असल्याने मार्चपासूनच उन्हाळ्याच्या (Summer) झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाची तीव्रता अशीच वाढत राहिल्यास एप्रिल आणि मे महिन्यात तापमान ४० वर जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
किमान तापमान १७ अंशांवर तर कमाल तापमान दुप्पट असल्याने बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना त्रास होत आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा वाटणे, घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जाणे या बाबींची देखील सुरुवात झाली आहे. तापमान बदल व वाढत्या उष्णतेमध्ये (Heat) पुरेशी काळजी न घेणाऱ्यांना त्याची झळ बसत आहे.
तापमान वाढू लागल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका, बिनाकारण उन्हामध्ये बाहेर जाऊ नका. कामानिमित्त बाहेरे जाबचे असेल तर छत्री, टोपी, हेल्मेट घाला, घरातील स्वच्छ पाणी बाहेो जाताना घेऊन निघा, सैल, सुती व फिकट रंगांचे कपडे परिधान करा, असा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी (Health Authorities) दिला आहे.
तसेच बाहेरचे तेलकट, मसालेदार अन्न खाणे, प्रत्येकालाच आवडत असली तरी किमान या तीन महिन्यात उन्हाळ्यात तरी थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे झाले आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले ठेवल्यास उन्हाळ्यातील अनेक समस्यांपासून दूर राहता येते. या तीन महिन्यात (Month) योग्य काळजी घेतल्यास उन्हाळा सुसह्य झाल्याशिवाय राहणार नाही.
अशी घ्या काळजी
■ डोक्याला रूमाल बांधा.
■ गॉगल वापरा.
■ सुती, सैल कपडे वापरा.
■ शक्यतो दोनदा आंघोळ करा.
■ जवळ ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर बाळगा.
■ रबरी चपला / सँडल्स वापरू नका.
■ उष्णतेमुळे डबा खाताना भाजी चांगली आहे ना याची खात्री करून खा.
■ चहाचे प्रमाण कमी करून कोकम, लिंबू, पाणी, नारळ पाणी व ताक यांचे नियमित सेवन करा.
■ उन्हातून आल्यावर लगेच कूलर अथवा एसीमध्ये जाऊन बसू नका.
■ उन्हातून आल्यावर लगेच गारेगार पाणी पिऊ नका.
■ रोज एक चमचा गुलकंद खा.
■ जंकफूड खाणे टाळा.