Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमNashik IT Case: पिडितांच्या गोपनियतेचा प्रश्न; न्यायालयाचा मोठा निर्णय, बंद दाराआड सुनावणी...

Nashik IT Case: पिडितांच्या गोपनियतेचा प्रश्न; न्यायालयाचा मोठा निर्णय, बंद दाराआड सुनावणी होणार

नाशिक | प्रतिनिधी
शहरातील आयटी क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणातील पीडितांची सामाजिक प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपण्यासाठी एसआयटीच्या विनंतीवरून न्यायालयाने या खटल्याचे कामकाज ‘इनकॅमेरा’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बंद दरवाजाआड होणाऱ्या सुनावणीत या प्रकरणातील अनेक धक्कादायक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सुशिक्षित महिलांना लक्ष्य करून त्यांचे शोषण केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नाशिकमध्ये संतापाची लाट आहे. पीडितांच्या ओळखीबाबत गोपनीयता पाळली जावी, जेणेकरून त्यांच्या सामाजिक आयुष्यावर परिणाम होणार नाही, ही भूमिका घेत एसआयटीने न्यायालयाकडे दाद मागितली होती. गुरुवारी (दि. १६) न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याने यापुढे या खटल्याची सुनावणी सार्वजनिक स्वरुपात न होता केवळ पीडित, संबंधित पक्षकार आणि न्यायाधिशांच्या उपस्थितीत पार पडेल.

- Advertisement -

Trambakeshwar: कडलगच्या मालमत्ता, संशयास्पद आर्थिक उलाढालींची झाडाझडती; भाविकांनी तक्रार दाखल करण्याचे एसआयटीचे आवाहन

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात संशयितांपैकी रझा मेनन आणि शफी शेख या दोघांचा ताबा एसआयटीने पुन्हा मिळवला आहे. न्यायालयाने त्यांना शनिवार (दि. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या चौकशीतून कंपनीतील विशिष्ट धर्माच्या कर्मचाऱ्यांनी रचलेले हे जाळे नक्की किती खोलवर पसरले आहे याचा छडा पोलीस लावत आहेत. इनकॅमेरा सुनावणीच्या निर्णयामुळे गुन्ह्यातील गुंतागुंत आणि संशयितांचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे तपासण्याला अधिक बळकटी मिळणार आहे. येत्या शनिवारपर्यंतच्या पोलीस कोठडीत रझा आणि शफी यांच्याकडून मिळणारी माहिती या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट करू शकते.

‘इनकॅमेरा’ म्हणजे काय ?
न्यायाधिशांच्या दालनात किंवा बंद खोलीत असा होतो. या सुनावणीदरम्यान न्याय कक्षाचे दरवाजे बंद केले जातात आणि बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला जातो.
या सुनावणीसाठी केवळ न्यायाधीश, दोन्ही पक्षकारांचे वकील, फिर्यादी (पीडित), आरोपी आणि न्यायालयाचे आवश्यक कर्मचारीच उपस्थित राहू शकतात. सर्वसामान्य जनता किंवा प्रसार माध्यमांना प्रवेश नसतो.
पीडित व्यक्ती किंवा साक्षीदाराची ओळख उघड होऊ नये आणि त्यांच्या खासगी आयुष्यावर सामाजिक परिणाम होऊ नये हा या सुनावणीमागचा मुख्य उद्देश असतो.
प्रामुख्याने बलात्कार, लैंगिक अत्याचार, पॉक्सोअंतर्गत गुन्हे, वैवाहिक वाद किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातील खटल्यांमध्ये इनकॅमेरा सुनावणी घेतली जाते.
अनेकदा गर्दीसमोर किंवा जाहीर न्यायालयात जबाब देताना पीडित व्यक्ती घाबरू शकते किंवा दडपणाखाली येऊ शकते. इनकॅमेरा सुनावणीमुळे तिला निर्भयपणे म्हणणे मांडता येते.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : जिल्ह्यात नऊ ठिकाणी केंद्रे; ६१९...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) एका जागेसाठी गुरुवारी (दि. १८) मतदान (Voting) होणार आहे. या...