Wednesday, April 8, 2026
HomeनाशिकNashik IVF Cneter Raid : बदलापूर स्त्री-बीज तस्करीचे नाशिक कनेक्शन; 'या'...

Nashik IVF Cneter Raid : बदलापूर स्त्री-बीज तस्करीचे नाशिक कनेक्शन; ‘या’ IVF सेंटरवर महापालिकेचा छापा

नाशिक | Nashik

ठाण्यातील बदलापूरमध्ये (Thane to Badlapur) स्त्री बीजाच्या (Egg trafficking) अवैध विक्रीचे रॅकेट उघड झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एका महिलेकडून एकदा नव्हे तर अनेक वेळा स्त्री बीज काढण्यात आल्याचे तपासात (Badlapur IVF Racket) समोर आले होते. यानंतर आता या स्त्री-बीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) आरोग्य विभागाने मुंबई नाका परिसरातील ‘मालती आयव्हीएफ सेंटर’ची कसून तपासणी केली. या तपासणीत महापालिकेने काही कागदपत्रे ताब्यात घेऊन बदलापूर येथे आढळलेल्या कागदपत्रांबाबत खुलासा करण्या संदर्भात मालती आयव्हीएफ सेंटरला नोटीस बजावली आहे.

दरम्यान, कायद्यानुसार (Law) एक महिला आयुष्यात फक्त एकदाच स्त्री बीज दान करू शकते, मात्र या रॅकेटमध्ये बनावट आधार कार्ड आणि प्रतिज्ञापत्रे तयार करून एकाच महिलेकडून अनेकदा (काही प्रकरणांत ३० पेक्षा जास्त वेळा) बीजे काढल्याची बाब समोर आली आहे. ही बीजे मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतील नामांकित आयव्हीएफ केंद्रांना लाखोंच्या किमतीत विक्री केल्याचे समजते.

नेमकं प्रकरण काय?

बदलापूर पूर्व येथील जोवेली भागातील एका इमारतीतून हे अवैध रॅकेट चालवले जात होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातून बेकायदेशीरपणे स्त्री-बीजे काढली जात होती. एका पीडित महिलेला ठरलेला मोबदला न मिळाल्याने तिने पोलिसांत धाव घेतली आणि या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, एका सायकलसाठी (स्त्री-बीज काढण्याची प्रक्रिया) महिलांना २५ ते ३० हजार रुपये दिले जात होते, तर हेच बीज पुढे नामांकित सेंटर्सना लाखांच्या किमतीत विकले जात होते. बदलापूरमधील छाप्यादरम्यान पोलिसांना नाशिकच्या ‘मालती आयव्हीएफ सेंटर’चे प्रमाणपत्र आणि काही संशयास्पद कागदपत्रे सापडली होती. या माहितीच्या आधारे नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते.

रॅकेटमधील ‘मास्टरमाइंड कोण?

कायद्यानुसार, एक महिला आपल्या संपूर्ण आयुष्यात केवळ एकदाच स्त्री-बीज दान करू शकते. मात्र, या रॅकेटमध्ये बनावट आधार कार्ड आणि बनावट प्रतिज्ञापत्रे तयार करून एकाच महिलेकडून अनेकदा (काही प्रकरणांत ३० पेक्षा जास्त वेळा) बीजे काढल्याचे उघड झाले आहे. या जीवघेण्या प्रक्रियेमुळे सुमारे ३०० हून अधिक महिलांचे शारीरिक शोषण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील अनेक नामांकित आयव्हीएफ केंद्रे पोलिसांच्या रडारवर आहेत. या रॅकेटमधील ‘मास्टरमाइंड’ कोण आहेत आणि नाशिकच्या सेंटरचा यात नेमका सहभाग किती, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

सबंधितांवर कारवाई करणार

नाशिक येथील मालती आयव्हीएफ सेंटरचे प्रमाणपत्र बदलापूरात सापडल्याने उपसंचालकांनी तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही मुंबई नाका परिसरातील सेंटरची तपासणी करून काही कागदपत्रे ताब्यात घेतली. तपासणीअंती काही निष्कर्ष आढळल्यास सबंधितांवर कारवाई करणार आहोत.

डॉ. जितेंद्र धनेश्वर, सहायक आरोग्य अधिकारी, नाशिक मनपा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : माजी महापौर कळमकर कडून आणखी एका तरूणीवर अत्याचार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar माजी महापौर अभिषेक कळमकर याने नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप शहरातील एका तरूणीने (वय 27) केला आहे. यासंदर्भात पीडित तरूणीने...