Thursday, March 27, 2025
Homeनाशिकजु.स.रुंगटा मध्ये भरणार ‘दप्तरविना शाळा’

जु.स.रुंगटा मध्ये भरणार ‘दप्तरविना शाळा’

नाशिक : जु. स.रुंगटा हायस्कूल मध्ये दर शनिवारी दफ्तरविना शाळा भरणार आहे. या उपक्रमाची सुरवात शनिवारपासून (दि. ७) करण्यात आली.

उपक्रमाची सुरवात कवी प्रशांत केंदळे यांच्या काव्य कार्यशाळेपासून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मिलिंद कचोळे, संस्थेचे माजी सचिव अरुण पैठणकर, शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. अहिरे तथा कवी दयाराम गिलाणकर मंचावर उपस्थित होते.

- Advertisement -

कवी प्रशांत केंदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काव्य रचना कशी करावी याबद्दल सांगितले. आपल्या रचलेल्या कविता त्यांनी विद्यार्थ्यांनकडून गाऊन घेतल्या. मुलांनी अतिशय आनंदाने व उत्साहाने कृतीसह कविता गायल्या.

या दप्तरविना उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, कथाकथन, वक्तृत्व, वजन मापे, भाषा कौशल्य कार्यशाळा, बँक भेट व व्यवहार परिचय, पोस्ट कार्यप्रणाली परिचय, परिसर भेट, करियर गाईडन्स, इलेक्ट्रॉनिक मीडिया अनुभूती इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहे.

उपक्रमाबद्दल माहिती देतांना मुख्याध्यापक डी.डी आहिरे यांनी असे सांगितले कि रोज साचेबद्ध शिक्षण घेतांना मुलांच्या मनावरील ताण तणाव वाढत आहे त्याचबरोबर यांची शाळेबद्दल ची गोडी कमी होत चालली आहे. मुलांमध्ये कृतियुक्त व आनंददायी शिक्षण दिल्यास मुलांची शिक्षणाबद्दलची गोडी वाढीस लागून त्यांच्यातील अध्ययन कौशल्य वाढीस लागेल.

त्याच बरोबर त्यांना दैनंदिन जीवनात वावरतांना ज्या कौशल्यांची गरज लागते त्याही त्यांना अवगत होतील. पदव्यत्तर शिक्षणानंतरही विद्यार्थ्यांना बँक, पोस्ट खाते, व्यवहार याबद्दलची माहिती नसते. ही माहिती त्यांना याच वयात विविध उपक्रमातून व प्रत्यक्ष भेटीतून दिल्यास त्यांचे व्यवहार ज्ञान वाढेल. भाषा विषयक कौशल्य कार्यशाळेतून त्यांची भाषा विकास होईल असे सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ मार्च २०२५ – उभारी देणारा उपक्रम

0
कोणत्याही सरकारी व्यवस्थांवर-सेवांवर सामान्यतः टीकाच केली जाते. विशेषतः सार्वजनिक आरोग्यसेवेचा उल्लेख केला तरी असंख्य तक्रारींचा पाऊस पडल्याचे अनेकदा आढळते. तथापि ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा एक...