Wednesday, October 30, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक-जयपूर विमानसेवा सुरु

नाशिक-जयपूर विमानसेवा सुरु

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिककरांसाठी मंगळवार (दि. २९) जयपुरसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. विमानाने अवघ्या तीन तासांवर आलेल्या जयपूसराठी आता दर मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी विमानेसवा असणार आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.

नाशिकहून जयपूरसाठी इंदूरमार्गे विमानसेवा इंडिगो एअरलाईन्सने मंगळवारी सुरू केली असून पहिल्याच दिवशी १० हजारांच्या आसपास तिकिटाचे दर राहीले. यानिमित्ताने पिंक सिटीला वाईन कॅपिटल जोडले गेले आहे, यामुळे पर्यटनवृध्दीची आशा बळावली आहे.

जयपुरहून सकाळी ११.२० वाजता नाशिककडे टेकऑफ केले तर नाशिक विमानतळावर दुपारी २.२० वाजता फ्लाइट पोहोचले, नाशिकहून २.४० वाजता टेकऑफ करून जयपूर विमानतळावर ५.३० वाजता फ्लाइट पोहोचले. मुंबईहून जयपूरऐवजी नाशिकहून थेट जयपुरकरिता फ्लाइट उपलब्ध झाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिकहुन जयपूर व सिकर या शहरांसाठी किमान १० ते १५ लग्झरी बसेस दररोज येजा करीत असतात. त्या व्यतिरिक्त मुंबई मार्गे रेल्वे व विमानाने नागरीक मोठ्या प्रमाणात जात असतात. त्या सर्व पर्यटकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.सोबतच नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला येणार्‍या राजस्थान व परिसरातील भाविकांसाठी ही चांगली सुविधा निर्माण झालेली असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या