Wednesday, April 2, 2025
HomeनाशिकNashik Kumbh Mela : मुकणेतून अतिरिक्त पाणी आणणार; त्र्यंबकेश्वरमध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र

Nashik Kumbh Mela : मुकणेतून अतिरिक्त पाणी आणणार; त्र्यंबकेश्वरमध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) नियोजनासाठी प्रशासनाने आता विषयनिहाय सखोल चर्चा करण्यावर भर दिला असून, सिंहस्थात आवश्यक असणारा पाणीप्रश्न आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV Camera) यांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) झालेल्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, स्मार्ट सिटी सीईओ सुमंत मोरे, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

आगामी सिंहस्थासाठी नाशिक शहरावर (Nashik City) वाढीव पाणीपुरवठ्याचा ताण वाढणार आहे. सध्याच्या स्थितीत ५५५ द.ल.लि. इतके पाणी दररोज पुरविले जात आहे. परंतू २०२७-२८ साठी ५.५० टक्के वाढीव पाणी लागणार आहे. त्यानुसार ६८० एमएलडी इतके पाणी दररोज लागणार आहे. तर सिंहस्थात साधारणतः २६.१० लाख लोकांसाठी मात्र ९४० एमएलडी पाण्याची प्रतिदिन गरज लागणार आहे. त्यामुळे तब्बल २६० एमएलडी इतके पाणी कमी पडणार असून ही तूट मुकणे धरणातून भागविली जाणार आहे. त्यासाठी विल्होळी येथे स्वतंत्र जलशुध्दीकरण केंद्राची उभारणी केली जाणार असून पाईपलाईनद्वारे शहरात पाणीपुरवठा केला जाईल.

त्यातून २६० एमएलडी प्रतिदिन पाण्याची गरज भागविली जाईल. त्यासाठी साधारणतः ४०० कोटींची आवश्यकता असून शासनाच्या नगरोत्थान विभागाकडे तसा प्रस्तावही सादर केला जाणार असल्याचे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले. तसेच त्र्यंबकेश्वरमध्येही (Trimbakeshwar) ८ एमएलडी इतक्या क्षमतेसाठी नवीन जलशुध्दीकरण कें द्राची उभारणी अन् संपूर्ण पाणीपुरवठ्यासाठी १०० कोटींची आवश्यकता असल्याचे सादरीकरण नगर परिषदेकडून करण्यात आले. हे दोन्ही प्रस्ताव नगरोत्थान विभागाकडे सादर केले जाणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

३३०० सीसीटीव्हींची गरज

शहरात मागणीप्रमाणे सीसीटीव्ही उभारले जाणार असून, त्यासाठी लागणाऱ्या ऑप्टिकल फायबर नेटवर्किंगचे कामही नियोजनात घेण्यात आले आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून २०० व महाआयटीच्या माध्यमातून १,१०० असे एकूण १,३०० सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. सिंहस्थ कालावधीत नाशिक शहरात अजून २,२०० कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. तर त्र्यबंकेश्वर येथेही १ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन आहे. त्यात गरजेनुसार कमी अधिक संख्या होणार आहे. यासाठी लागणारे ऑप्टिकल केबलचे काम बीएसएनएलच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ajit Pawar : कुणाचीच दादागिरी खपवून घेणार नाही; बीडमध्ये अजित पवारांचा...

0
मुंबई । Mumbai उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बीड दौऱ्यावर असून, पालकमंत्री म्हणून हा त्यांचा दुसरा दौरा आहे. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत राष्ट्रवादीच्या युवा संवाद मेळाव्यात...