Sunday, April 27, 2025
Homeनाशिकनाशिक महिला पोलिसांनी अनुभवला ‘मर्दानी-२’

नाशिक महिला पोलिसांनी अनुभवला ‘मर्दानी-२’

नाशिक : धाडसी महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कर्तृत्वावर आधारित अभिनेत्री राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत असलेला मर्दानी २ या चित्रपटाचा आस्वाद नाशिक ग्रामीणच्या पोळी अधीक्षक आरती सिंग आणि पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी तीनशे महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह घेतला.

दरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महिला पोलिसांसाठी हा विशेष शो आयोजित केला होता. यावेळी शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या.

- Advertisement -

महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तृत्वाला वाव मिळावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे व कामावरचा ताण हलका व्हावा याकरिता सिने – मँक्स येथे स्पेशल शो चे आयोजन केले होते. महिलांना कर्तव्य बजावतांना येणारे अडचणी व त्यांना यातून स्फुर्ती मिळावी हा त्या मागचा मुख्य उद्देश होता. याचा लाभ शहरातील व ग्रामीण भागातील 300 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घेतला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...