Wednesday, July 29, 2026
HomeनाशिकNashik Leopard News : १८ तासांनी सापडला बिबट्याने ओढून नेलेल्या बालकाचा मृतदेह;...

Nashik Leopard News : १८ तासांनी सापडला बिबट्याने ओढून नेलेल्या बालकाचा मृतदेह; एकुलता एक लेक गेला, कुटुंबाने फोडला टाहो

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील वडनेर गेटतून बिबट्याने (Leopard) श्रुतिक गंगाधर या दोन वर्षाच्या मुलावर (Child) हल्ला करत त्याला घराच्या ओट्यावरून ओढून नेल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. यानंतर आर्मीचे जवान आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून श्रुतीकचा शोध घेतला जात होता. अखेर १८ तासानंतर या दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह आज (बुधवारी) दुपारी पावणे तीन वाजता आर्टिलरीच्या जंगलात आढळून आला आहे.

- Advertisement -

बिबट्याने दोन वर्षीय बालकावर हल्ला करून नेले ओढून; बालकाचा शोध सुरु

श्रुतिक गंगाधर याला बिबट्याने घराच्या ओट्यावरून ओढून नेले होते. यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण आर्टिलरी सेंटरचे जंगल आर्मीचे जवान व वनविभागाच्या अधिकार्‍यांनी (Forest Department) पिंजून काढले. सुमारे अडीचशे ते तीनशे अधिकारी कर्मचारी मृत बालकाचा शोध घेत होते. त्यासाठी थर्मल ड्रोन, श्वानपथक यासह आदींचा वापर करण्यात आला.

त्यानंतर आज दुपारी पाहुणे तीन वाजता श्रुतीकचा मृतदेह (Dead Body) आर्टिलरीच्या जंगलात आढळून आला. श्रुतिकचे वडील गंगाधर हे लष्करी जवान असून, ते मुळचे कर्नाटकचे आहेत. त्यांची एक वर्षांपूर्वीच नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये बदली झाली होती. श्रुतिक हा एकुलता एक मुलगा होता. मात्र आता त्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ जुलै २०२६ – ग्राहक हक्कांची डिजिटल चळवळ

0
वाढती महागाई, तांत्रिक आव्हाने आणि शासकीय पातळीवरील धोरणात्मक निर्णय जेव्हा थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागतात, तेव्हा असंतोष व्यक्त करण्याचे...