Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

Nashik Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील वडनेर दुमाला (Vadner Dumala) गावात शुक्रवारी (दि.०८) रोजी रात्री आयुष किरण भगत या चार वर्षाच्या बालकावर बिबट्याने (Leopard) हल्ला करून त्याला जवळ असलेल्या एका शेतात ओढत नेले होते. त्यानंतर गावातील नागरिकांनी (Citizen) तसेच वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी व नातेवाईकांनी तब्बल साडेतीन तास शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह रात्री बारा वाजेच्या सुमारास गावा लगत ऊसाच्या मळ्यात आढळून आला.

- Advertisement -

गेल्या दोन ते चार दिवसापासून नाशिकरोडच्या (Nashik Road) जय भवानी रोड येथे बिबट्याचा वावर सुरू आहे. या घटना ताज्या असतानाच वडनेर दुमाला येथे आयुष किरण भगत या चार वर्षाच्या बालकाला (Boy) बिबट्याने घराबाहेर ओट्यावरून ओढत नेले व त्याच्यावर हल्ला करून जवळच असलेल्या शेतात नेले. या घटनेनंतर नातेवाईक व आजूबाजूच्या नागरिकांना शोधमोहीम सुरू करून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यानंतर तातडीने वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी ड्रोनच्या साह्याने व्यापक शोधमोहीम राबवली.

YouTube video player

या मोहिमेमध्ये उपनगर पोलीस ठाण्याचे (Upnagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे श्वान पथक (डॉग स्कॉड), गुगल श्वान, स्थानिक लोकप्रतिनिधी, गावकरी युवक, आणि वनविभागाचे अधिकारी सक्रिय सहभागी होते. या शोध मोहिमेदरम्यान घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दाराजवळ रक्ताचे डाग व थोड्या अंतरावर मुलाची पॅन्ट आढळून आली होती. त्यानंतर तातडीने व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. या शोध मोहिमेत गावकरी तसेच माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम कोठुळे यांच्यासह आदी वडनेर गेट, वडनेर गाव, कारगिल गेट, विहितगाव परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग होता. मात्र दुर्दैवाने आयुषचा मृतदेह हाती लागल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, आयुषचे वडील किरण भगत हे खाजगी कंपनीत (Private Company) काम करत असून, त्यांना एक मुलगी आणि आयुष हा मुलगा होता. मात्र, रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येलाच आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर दु:खाच्या सागरात बुडाला आहे. या दुर्दैवी घटनेने वडनेर दुमाला परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

ड्रोनची मदत

घटना घडल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ड्रोनच्या मदतीने आयुषचा शोध सुरू केला. त्याच्या घरापासून ५०० ते ७०० फुटावर उसाच्या मळ्यात आयुष आणि बिबट्या असल्याचे संकेत ड्रोनने दिल्यानंतर शोध कार्यातील युवक, वनाधिकारी, पोलीस येथे पोहोचले. त्यावेळी अवघ्या दहा फुटावर बिबट्या असल्याचे ड्रोन चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वांना सावध केले. यावेळी वनविभागाचे अधिकारी नागरिकांचा मोठा जमा होता, तरी मात्र बिबट्या हाती लागला नाही.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...