Thursday, June 18, 2026
HomeनाशिकNashik Leopard News : शेतमजुरावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

Nashik Leopard News : शेतमजुरावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद

ओझे | विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) ओझे येथे (दि. १५ मे) रोजी बिबट्याने (Leopard) ओझे येथील बाळू धुळे या शेतमजुरावर उसाच्या शेतात (Farm) तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र हातात काठी असल्यामुळे बिबट्याचा तो प्रयत्न यशस्वी झाला आणि शेतमजुराने उसाच्या शेतातून पळ काढला. सदर घटनेची माहिती वनविभागाला कळवण्यात आली होती. यानंतर वनविभागाने त्वरित याठिकाणी पिंजरा लावला असता आठ दिवसानंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. वनविभागाला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती मिळताच बिबट्याला पुढील तपासणीसाठी दिंडोरी येथे घेवून गेले आहे. मात्र बिबट्याची मादी जेरबंद झाली असली तरी त्याचे बछडे तेथेच उसात असल्यामुळे त्या बछड्यांना शोधण्याचा एक नवीन प्रश्न वनविभागा निर्माण झाला आहे.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षापासून सदर बिबट्या याच परिसरात उसाच्या शेतात वास्तव्याला असल्याचे सर्व शेतकऱ्यांकडून (Farmer) सांगण्यात येत होते. रोज कुणाला ना कुणाला या बिबट्याचे दर्शन होत असायचे. मात्र कुणावर हल्ला होत नसल्यामुळे त्याचे गांभीर्य कोणी घेत नव्हते. जेव्हा बिबट्याने शेतमजुरावर हल्ला केला तेव्हापासून ओझे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण होते. कुणी उसाला पाणी देण्यासाठी जात नव्हते. परंतू आज बिबट्या जेरबंद झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. तर बछडे अजूनही उसाच्या शेतात असल्यामुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण कायम आहे. प्रविण शिंदे यांच्या उसाच्या शेतात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली होती. ज्या शेतमजुरांवर बिबट्याने तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्याला प्रत्यक्षदर्शनी बोलावून घेत बिबट्या तोच आहे का याची शहानिशा केली.

त्यावेळी बाळू धुळे या शेतमजुराने याच बिबट्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितले. त्यावेळेस शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला. त्याचप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी मेंढपाळावर जिथे हल्ला झाला वनविभागाने पंचनामा करून पिंजरा लावलेला आहे तेथे अजून बिबट्या जेरबंद होण्याची प्रतीक्षा आहे. त्या ठिकाणच्या शेतकरी वर्गाने पिंजऱ्यामध्ये बिबट्याचे भक्ष टाकण्याची आवश्यकता आहे तेव्हाच बिबट्या भक्ष घेण्यासाठी पिंजऱ्यात (Cage) प्रवेश करेल, मात्र त्या पिंजऱ्यात भक्ष ठेवलेले नसल्याची माहिती मिळत आहे. भक्ष ठेवण्यास बिबट्या पिंजऱ्यात येऊ शकतो अशी माहिती पुढे येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ओझे परिसरामध्ये अनेक बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे उसाच्या शेतात कुणी शेतमजूर काम करण्यास तयार होत नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला होता. या बिबट्याने माझ्या शेतात काम करणाऱ्या बाळू धुळे या शेतमजुरावर तीन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हातात काठी असल्यामुळे शेतमजुराने प्रतिकार केल्यामुळे तो वाचला. आज जरी बिबट्या जेरबंद झाला तरी या उसाच्या शेतात असलेल्या छोट्या बछड्यांचे काय? त्यामुळे वनविभागाने त्या बछड्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली पाहिजे.

प्रविण शिंदे,शेतकरी ओझे

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...