Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Leopard News : जय भवानीरोड येथे बिबट्याचा घरात घुसण्याचा प्रयत्न

Nashik Leopard News : जय भवानीरोड येथे बिबट्याचा घरात घुसण्याचा प्रयत्न

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील जय भवानी रोड (Jay Bhavani Road) परिसरात गेल्या चार-पाच दिवसापासून दिवसा व मध्यरात्री रोजच बिबट्याचे (Leopard) दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिक व महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून, आता तर चक्क बिबट्याने एका घरात आज (मंगळवारी) पहाटे घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीचा आवाज व लाईटमुळे बिबट्या फरार झाला.

- Advertisement -

जय भवानी रोडवर असलेल्या कापूर सिंग मळा येथे पहाटे बिबट्याचे दर्शन झाले. स्थानिक रहिवासी रीपीयाल सिंग यांनी बिबट्याला आपल्या गाडीतून पाहिले. बिबट्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, रीपीयाल सिंग यांच्या गाडीचा आवाजामुळे व हेडलाईटमुळे त्याने धूम ठोकली. त्यानंतर रीपीयाल सिंग यांनी मनसे शहर उपाध्यक्ष ॲड नितीन पंडित यांना कळवल्यावर वनविभागाला सांगितले.

दरम्यान, बिबट्याचे दर्शन रोजच घडत आहे. त्यामुळे नागरिक महिला भयभीत व दहशतीखाली आहे. वनविभाग (Forest Department) यांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे. या परिसरामध्ये दुर्घटना होऊ शकते अशी एक प्रकारची चाहूल आहे. यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करावी अन्यथा जन आंदोलन करण्यात येईल. नागरिक रस्त्यावरती येतील. असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...