Thursday, March 27, 2025
Homeनाशिकमानूर शिवारात बिबट्याचा वावर; वनविभागाने लावला पिंजरा

मानूर शिवारात बिबट्याचा वावर; वनविभागाने लावला पिंजरा

पंचवटी : औरंगाबाद रोडवरील मानूर गाव येथील मळे परिसरात रविवारी (दि.८) बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. अनवट यांच्या मळ्यातील विहिरीलगत बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने वनविभागाने दुपारी पिंजरा लावला असून रात्रीच्या सुमारास नागरिकांना काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

नांदूर – मानूर परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती असून, रविवारी (दि.८) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मानूर येथील शेतकरी कुटुंबातील इयत्ता नववीत शिकणारा विनीत अनवट आपल्या उसाच्या शेतात पाणी सोडण्यासाठी विहिरीवर मोटर सुरु करण्यासाठी गेला. विनीत विहिरीजवळ पोहचणार तोच त्याला समोर बिबट्या नजरेस दिसला. यावेळी विनीत घाबरल्याने तेथून धावत घरी पोहचल्या नंतर घडला प्रकार सांगितला.

- Advertisement -

काही वेळातच ही वार्ता येथील अनवट वस्तीवर पोहचल्याने शेतकऱ्यांची गर्दी झाली. तर काहींनी वन विभागाला माहिती दिली. दुपारी एक वाजेच्या सुमारास वन अधिकारी याठिकाणी पिंजरा घेऊन दाखल झाले. बिबट्या असल्याच्या पाऊलखुणा आढळून आल्यावर या परिसरात बिबट्या असल्याची खात्री पटल्यावर अनवट यांच्या उसाच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ पिंजरा लावण्यात आला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, अग्निशामक दलाचे जवान, आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्यासह वनपाल नाशिक वन परिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, सातपूर वन परिमंडळ अधिकारी ओंकार देशपांडे, वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे यांच्यासह आदी वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले होते. त्यांनी येथील वस्तीवर सायंकाळी विशेषतः रात्री नागरिकांनी एकटे घराबाहेर पडू नये, लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, पाळीव जनावरे यांना सुरक्षित जागी ठेवावे, परिसरातील लाईट सुरु ठेवावेत. अशा प्रकारे सूचना केल्या. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ मार्च २०२५ – उभारी देणारा उपक्रम

0
कोणत्याही सरकारी व्यवस्थांवर-सेवांवर सामान्यतः टीकाच केली जाते. विशेषतः सार्वजनिक आरोग्यसेवेचा उल्लेख केला तरी असंख्य तक्रारींचा पाऊस पडल्याचे अनेकदा आढळते. तथापि ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा एक...