Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्या'नाशिक उडता' पंजाब झालंय का? संजय राऊतांचा सवाल; 'या' तारखेला ठाकरे गटाचा...

‘नाशिक उडता’ पंजाब झालंय का? संजय राऊतांचा सवाल; ‘या’ तारखेला ठाकरे गटाचा मोर्चा

नाशिक | Nashik

नाशिकमध्ये वाढत्या ड्रग्जचा व्यापार आणि शहरातील वाढती (Drugs Factory In Nashik) गुन्हेगारीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Shivsena Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), माजी पालकमंत्री आणि मंत्री छगन भुजबळ (Minister Chagan Bhujbal) आणि पोलीस यंत्रणेवर टिकास्र सोडले आहे. नाशिक जिल्ह्याने अनेक मोठे नेते दिले आहेत. अनेक मोठे नेते दिले आहेत. पण, सात-आठ महिन्यांपासून ज्या विषयासाठी नाव घेतले जातेय ते शोभणारे नाही. ड्रग्स माफिया आणि नाशिकचे संबंध जोरदार चर्चेला आलेत, अशी टीका ही खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -

“नाशिकच्या घराघरात ड्रग्ज पोहोचले आहे. तरुण मुले, विद्यार्थी शाळा, कॉलेज पान टपऱ्या, छोटी-छोटी दुकाने नाशिकमध्ये असा ड्रग्जचा व्यवहार सुरू आहे. तरुण पिढी जर बर्बाद होत असेल तर शासकीय यंत्रणा पालकमंत्री, मंत्री, आमदार आणि पोलीस सहभागी असतील तर शिवसेना स्वस्थ बसू शकत नाही. यासंदर्भात उद्धव ठाकरेंशी चर्चा झालेली आहे. नाशिकला हा जो ड्रग्जचा विळखा पडलेला आहे.

…त्या नंतर ह्या मुलांनी काय करायचे? ; कंत्राटी भरतीवरुन शरद पवारांची राज्य सरकारवर टीका

संजय राऊत म्हणाले की, नाशिक ड्रग्स प्रकरणा संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची काळजी असेल तर नाशिकमधील ड्रग्स प्रकरणाची चौकशी करतील. ललित पाटील ससूनमध्ये इतके दिवस कसा राहिला, तो जेल मधून कसा बाहेर आला? त्याला कुठल्या भाजपाच्या माणसाने मदत केली हे सगळ रेकॉर्डवर आलेले आहे, असेही राऊत म्हणाले. सर्वात आधी दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, ते पुरावे संदर्भात छेड- छाड करत असल्याचे खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

शाळा-महाविद्यालयांना ड्रग्सचा विळखा बसला आहे. कॉलेजमधील तरुण-तरुणींना दप्तरातून ड्रग्स पुरवले जातये. पालक अस्वस्थ आहेत. गेल्या सहा महिन्यात २० ते ३५ वयोगटातील साधारण १०० च्या आसपास तरुणांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालेय की त्यांचा मृत्यू अंमली पदार्थांमुळे झाला आहे, असे राऊत म्हणाले.

एमडी ड्रग्स, कुत्ता गोली, रोलेट अशा प्रकारचे ड्रग्स विकले जात आहेत. कोट्यवधींचा ड्रग्स कारखाना नाशिकमध्ये नष्ट करण्यात आला आहे. यात पोलिस आणि राजकीय आश्रय नक्की आहे. यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. याला जबाबदार कोण आहे? नाशिकचे सध्याचे पालकमंत्री आणि ज्यांना पालकमंत्री व्हायची इच्छा आहे. सध्याच्या परिस्थितीसाठी जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

शरद पवारांचं टेन्शन वाढणार? अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन हस्तक्षेप याचिका दाखल

२० तारखेला ड्रग्जविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा

“२० तारखेला शिवसेना विराट मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहे. हा मोर्चा फक्त शिवसेनेचा नसून या शहरासोबत जिल्ह्यातील नागरिकांनी आणि पालकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होऊन आपला निषेध व्यक्त करावा. यासाठी आमचे प्रयत्न राहतील, हा विषय राजकीय नसून सामाजिक आहे. हे राजकारण नाही, ज्यांना ज्यांना आमच्या आंदोलना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे.

सौ सोनार की एक लोहार की

सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत कडक ताशेरे ओढले असून यावरुन संजय राऊत यांनी ही टोला लगावला आहे. विधानसभा अध्यक्ष हे खडेबोल सुनावण्याच्या योग्यतेचेच आहेत. ज्या गांभीर्याने संविधान घ्यायला पाहिजे, त्या गांभीर्याने त्यांनी घेतले नाही.

टोलसंदर्भात राज ठाकरे-दादा भुसेंच्या बैठकीत सकारात्मक चर्चा; काय ठरलं?

तुम्ही सुप्रीम कोर्टाला काय नौटंकी समजलात का? सौ सोनार की एक लोहार की असं म्हणत त्यांनी राहुल नार्वेकर यांना डिवचले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी आणि त्यांच्या पालकांनी यातून शहाणपण घेतले तर बरे होईलय. अन्यथा हे लोक न्यायव्यवस्था कशी पायदळी तुडवता हे उघड होईल.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या