Saturday, May 4, 2024
Homeनाशिकदुपारपर्यंत आकाशात पतंग उडालेच नाही

दुपारपर्यंत आकाशात पतंग उडालेच नाही

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नववर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतिचा (Makarsankranti) उत्साह मावळलेला दिसून येत आहे. एकीकडे झोंबणारी थंडी (Cold in nashik) अन दुसरीकडे वाढत चाललेले करोनाचे रुग्ण (Covid 3rd phase outbreak) यामुळे यंदाही सण उत्सवातील आनंदावर विरजण पडलेले दिसून येत आहे…

- Advertisement -

नाशिकमधील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. गृहस्थानबद्ध (Home Quarantine) असलेले रुग्ण आणि रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण यांचा आकडा नाशकात मोठा आहे. त्यामुळे यंदा मकरसंक्रांतिच्या दिवशी सकाळपासून पतंग उडविणाऱ्यांची गर्दी काही दिसून येत नाही. सुर्यनारायणाचे दर्शन झालेले नाही, त्यामुळे झोंबणारी थंडी घराबाहेर पडू देत नसल्याने अनेकांनी दुपारनंतर पतंग उडविण्याचा आनंद घेण्याचे ठरवले आहे.

दरम्यान, काल (दि १३) सायंकाळी पतंगाची खरेदी करण्यासाठी बाजार भरलेला होता. वाहनांची मोठी वाहतूक कोंडी रविवार कारंजा, मेनरोडसह नवीन नाशिक, पंचवटी, सातपूर आणि नाशिकरोड मधील मुख्य मार्केट परिसरात झालेली होती.

अनेक घरांत वेगवेगळ्या पद्धतीने मकरसंक्रांत साजरी करण्याच्या प्रथा आहेत. त्यामुळे काहींनी सकाळी पूरणपोळीचा आस्वाद घेतला तर अनेकांनी तिळगुळ वाटून प्रेम आणि आदरभाव व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या