नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Election) २०२५-२६ साठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी (Applications Rejected) प्रक्रिया काल शहरातील सर्व दहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये पार पडली. या छाननीत शहरा तील ३१ प्रभागांमधून दाखल झालेल्या एकूण २,३५६ नामनिर्देशन अजपैिकी २७७अर्ज अवैध ठरविण्यात आले, तर २०७९ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. छाननी प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणाचे स्पष्ट चित्र समोर आले असून, आता उमेदवारी माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छाननी प्रक्रियेत बहुतांश अर्ज हे अपूर्ण कागदपत्रे, डबल अर्ज, आरक्षणविषयक त्रुटी तसेच प्रतिज्ञापत्रातील दोष यामुळे अवैध ठरविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सर्व अर्जाची काटेकोर तपासणी करण्यात आली असून, प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार राबविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.शहरातील सर्व दहा निवडणूक सहाय्यक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये एकाचवेळी छाननी प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी कामकाज पाहिले. छाननीदरम्यान उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : भाजपमध्ये एबी फॉर्मचा हायव्होल्टेज ड्रामा; नाशकात बडगुजर कुटुंबियांची सरशी
काही ठिकाणी आक्षेप नोंदविण्यात आले असले तरी बहुतेक प्रकरणांत नियमांच्या चौकटीत निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे काही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज बाद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक प्रभागांतील लढती आता तुलनेने मर्यादित उमेदवारांमध्येच होणार आहेत, छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारी माघारीनंतर निवडणूक प्रचार अधिक वेग घेण्याची शक्यता आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने रिंगणात असल्याने यंदाची महापालिका निवडणूक (Election) चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रभाग ३०, ३१ मधील एबी फॉर्मच्या गोंधळावर पडदा
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ३० व ३१ मध्ये एबी फॉर्मच्या वाटपावरून निर्माण झालेला गोंधळ अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी अंती मिटवला. एका जागेसाठी दोन उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चचर्चा रंगली होती. प्रभाग ३१ मध्ये शिवसेना (शिंदे गट) कडून एकाच जागेसाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याचा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात पूजा शिवा तेलंग यांनी लेखी हरकत दाखल केली होती. आपण शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार असून प्रभाग क्रमांक ३१ (ब) साठी अर्ज व एबी फॉर्म विधीपूर्वक सादर केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, अर्चना रवींद्र गामणे यांनी देखील शिवसेना पक्षाच्या नावाने एबी फॉर्म व अर्ज सादर केल्याने वाद निर्माण झाला. तेलंग यांनी आपल्या हरक्तीत नमूद केले होते की, अर्चना गामणे यांचा एबी फॉर्म हा पक्षाच्या अधिकृत अधिका-याकडून देण्यात आलेला नसून तो अनधिकृत, अवैध आहे. त्यामुळे संबंधित उमेदवाराचा एबी फॉर्म व नामनिर्देशन अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंची सुनावणी घेतली. सुनावणीनंतर अर्चना रवींद्र गामणे यांनी प्रथम नामनिर्देशन अर्ज दाखल केल्याचा आधार घेत त्यांनाच शिवसेना (शिंदे गट) चा अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले. त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आल्याने पूजा तेलंग यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.दरम्यान, प्रभाग ३० मध्येही असाच प्रकार समोर आला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून ३० (ड) सर्वसाधारण गटासाठी निशांत जाधव व नीलेश साठ्खे या दोघांना एबी फॉर्म देण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला होता. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकान्यांनी सुनावणी घेऊन निशांत जाधव यांनाच उबाठा गटाचा अधिकृत उमेदवार घोषित केले. त्यांचा एबी फॉर्म व नामनिर्देशन अर्ज वैध ठरवण्यात आला. याशिवाय प्रभाग ३१ (अ) मधील उमेदवार अविनाश शिंदे यांच्या डॉक्टर पदवीबाबत अनिल गायकवाड यांनी हरकत नोंदवली होती. मात्र, नामनिर्देशन पत्रामध्ये डॉक्टर या पदाचा उल्लेख नसल्याने ही हरकत फेटाळून लावण्यात आली.
नाशिकरोड विभागात एकूण ३७३ वैध अर्ज
नाशिकरोड विभागात एकूण सहा प्रभागातून इतके ४५६ अर्ज प्राप्त आले. छाननी दरम्यान ३७३ अर्ज वैध तर ८३ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर दि.२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास महापालिकेच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला होता. दि. ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सहा प्रभागांतून ४५६ इतके अर्ज दाखल झाले तर बुधव ।री (दि.३१) उमेदवारी अजाँची छाननी करण्यात आली. यावेळी ३७३ इतके अर्ज वैध ठरवण्यात आले असून, काही त्रुटीमुळे ८३ अर्ज अवैध ठरविण्यात आले आ हेत. दरम्यान आज व उद्या उमेदवारी मागे घेण्याचा दिवस असून, कोण उमेदवार मागे घेतो व कोण रिंगणात राहणार याबाबतचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.
प्रभागनिहाय छाननीनंतरची स्थिती
प्रभाग १ मध्ये ६५ अर्ज दाखल झाले होते तर १ अर्ज अवैध, ६४ वैध ठरले. प्रभाग २ मध्ये ८५ पैकी २ अवैद्य, ८३ वैध अर्ज आहेत, प्रभाग ३ मध्ये ७४ पैकी २ अवैध, ७२ वैध अर्ज राहिले. प्रभाग ४ मध्ये ५३ पैकी १ अवैध, ५२ वैध ठरले. प्रभाग ५ व ६ मध्ये सर्व अर्ज वैध ठरले आहेत. प्रभाग ७ मध्ये ५३ पैकी २ अर्ज बाद झाले. प्रभाग ८ मध्ये दाखल सर्व ६० अर्ज वैध तरले. प्रभाग ९ मध्ये ३८ पैकी ७ अर्ज अवैध ठरले. प्रभाग १० मध्ये १११ पैकी ३३ अर्ज बाद झाले. प्रभाग ११ मध्ये ९६ पैकी अर्ज अवैध ठरले प्रभाग १२ मध्ये ६५ पैकी १ अर्ज बाद झाला प्रभाग १३ मध्ये सर्वाधिक छाननी झाली असून ९५ पैकी तब्बल ३६ अर्ज अवैध ठरले. प्रभाग १४ मध्ये १३४ पैकी १५ अर्ज अवैध ठरविण्यात आले. प्रभाग १५ मध्ये ३९ पैकी ६ अर्ज बाद झाले. प्रभाग १६ मध्ये ६३ पैकी १ अर्ज अवैध तरला. प्रभाग १७ मध्ये सर्व ७१ अर्ज वैद्य ठरले. प्रभाग १८ मध्ये ९१ पैकी ३ अर्ज अवैध प्रभाग १९ मध्ये ७२ पैकी १ अर्ज बाद. प्रभाग २० मध्ये ७४ पैकी २५ अर्ज अवैध ठरले. प्रभाग २१ मध्ये ११० पैकी ३९ अर्ज बाद झाले. प्रभाग २२ मध्ये ५० पैकी १५ अर्ज अवैध, प्रभाग २३ मध्ये ६७ पैकी १ अर्ज बाद. प्रभाग २४ मध्ये ८० पैकी २ अर्ज अवैध. प्रभाग २५ मध्ये ९२ पैकी ३० अर्ज बाद झाले. प्रभाग २६ मध्ये ३५ पैकी १७ अर्ज अवैध ठरले. प्रभाग २७मध्ये ७८ पैकी १ अर्ज बाद. प्रभाग २८ मध्ये ६७ पैकी २६ अर्ज अवैध. प्रभाग २९ मध्ये दाखल सर्व १०० अर्ज वैध ठरले. प्रभाग ३० मध्ये सर्व ७९ अर्ज वैध प्रभाग ३१ मध्ये ९८ पैकी ३ अर्ज अवैध ठरले.





