Tuesday, April 21, 2026
HomeनाशिकNashik MC Election : बटण दाबले धनुष्यबाणाचे अन् लाईट लागली...; नाशकातील मतदाराचा...

Nashik MC Election : बटण दाबले धनुष्यबाणाचे अन् लाईट लागली…; नाशकातील मतदाराचा मोठा दावा

नाशिक | Nashik

महापालिकेच्या १२२ जागांसाठी आज (दि.१५) रोजी सकाळी साडे सात वाजेपासून शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. मतदानाच्या सुरुवातीला सकाळी काही प्रभागांतील ईव्हिएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहेत. अशातच आता प्रभाग क्रमांक २४ मधील एका मतदान केंद्रावर धनुष्यबाणाचे बटण दाबल्यानंतर कमळाची लाईट लागल्याचा दावा एका मतदाराने केला आहे.

- Advertisement -

याबाबत माध्यमांशी बोलतांना गिरीश शिरवाडकर या मतदारांना सांगितले की, ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर माझे मतदान होते. ज्यावेळेस मी मतदान केंद्रावर मतदानासाठी आलो असता त्यावेळी मी मत देण्यासाठी धनुष्यबाणाचे बटण दाबले. परंतु, त्यांच्यासमोरचा लाईट न लागता अनु क्रमांक १ समोरील कमळाच्या बटणाचा लाईट लागला. त्यानंतर ही गोष्ट मी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, असं त्यांनी म्हटले.

यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराने या प्रकाराबाबत थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. मतदान करताना ईव्हीएममध्ये तांत्रिक गडबड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, तातडीने चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकावले जात असल्याचा आरोपही शिंदे सेनेच्या उमेदवाराने केला आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक २४ मधील या प्रकारानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सध्या परिस्थिती आटोक्यात असून, मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू आहे. या प्रकरणानंतर आता निवडणूक आयोग काय कारवाई करते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Rahuri : खरिप हंगामापूर्वी शेतकर्‍यांची कर्जमाफी करणार – मुख्यमंत्री फडणवीस

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri शेतकर्‍यांना दिलासा देणे ही केवळ घोषणा नसून ती आमची बांधिलकी आहे. खरिप हंगामापूर्वी शेतकर्‍यांची कर्जमाफी करणार असून जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड...