Saturday, May 2, 2026
HomeनाशिकNashik MC Election Result : नाशिकमध्ये 'या' उमेदवारांची विजयाकडे वाटचाल

Nashik MC Election Result : नाशिकमध्ये ‘या’ उमेदवारांची विजयाकडे वाटचाल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी काल (दि.१५) रोजी ५६.७६ टक्के मतदान झाले होते. २०१७ मध्ये ६१.६० टक्के मतदान झाले होते यात यंदा सुमारे ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.शहरातील १,५६३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. त्यानंतर आज (दि.१६) रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतमोजणी पार पडत असून, आता इव्हीएमची मतमोजणी सुरु झाली आहे.

- Advertisement -

सुरुवातील पोस्टल मतमोजणीत भाजपच्या उमेदवारांनी बहुतांश ठिकाणी आघाडी घेतली होती. याशिवाय भाजपचे बंडखोर शशिकांत जाधव आणि अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आघाडीवर आहेत. त्यामुळे पहिल्या निकाल कधी हाती येणार याची उत्सुकता सर्वांना होती. यानंतर आता नाशिकमध्ये शिंदे शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांची विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे.

नाशिकच्य प्रभाग १६ मधून शिवसेनेचे राहुल दिवे, आशा तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे हे चारही उमेदवार विजयी झाल्याचे समजते असून, त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. तर प्रभाग क्रमांक २५ मधील अ गटातून भाजपचे सुधाकर बडगुजर आणि ब गटातून साधना मटाले विजयी झाल्याचे समजते. तर क गटातून शिंदे सेनेच्या कविता नाईक आणि ड गटातून ठाकरे सेनेचे मुरलीधर भामरे विजयी झाल्याचे कळते.

दरम्यान, प्रभाग सातमध्ये भाजपचे सुरेश पाटील, हिमगौरी अडके.स्वाती भामरे आणि शिंदे शिवसेनेचे अजय बोरस्ते आघाडीवर आहेत. तर प्रभाग क्रमांक २० मधून भाजपचे सतीश निकम, सीमा ताजणे, गायकवाड जयश्री आणि शिंदे सेनेचे कैलास मुदलियार विजयी झाले आहेत.

ताज्या बातम्या