नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी काल (दि.१५) रोजी ५६.७६ टक्के मतदान झाले होते. २०१७ मध्ये ६१.६० टक्के मतदान झाले होते यात यंदा सुमारे ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.शहरातील १,५६३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. त्यानंतर आज (दि.१६) रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतमोजणी पार पडत असून, पोस्टल मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
नाशिकच्या २०,२१,२२ या प्रभागातील उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना अद्याप मतदान केंद्रात प्रवेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रभाग क्रमांक २५,२६ आणि २८ मध्ये मतमोजणी अद्यापपर्यंत सुरु झालेली नाही. तर नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली असून, अगोदर टपाली मतदान मोजले जात आहेत.




