Saturday, May 9, 2026
HomeराजकीयNashik MC Election Result : प्रभाग क्रमांक २७ मध्ये पराभूत उमेदवाराचा कार्यकर्त्यांसह...

Nashik MC Election Result : प्रभाग क्रमांक २७ मध्ये पराभूत उमेदवाराचा कार्यकर्त्यांसह ठिय्या; कारण काय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी काल (दि.१५) रोजी ५६.७६ टक्के मतदान झाले होते. त्यानतंर आज (दि.१६) रोजी मतमोजणी झाली असता भाजपने (BJP) बहुमताचा आकडा गाठला आहे. नाशिकमध्ये (Nashik) भाजपला तब्बल ७२ जागांवर विजय मिळाला आहे. तर शिंदे सेनेला २६, शिवसेना उबाठाला १५, काँग्रेसला ०३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०४, मनसेला एक आणि अपक्ष उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे. त्यामुळे आता नाशिक महापालिकेत भाजपचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

परंतु, प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांसह त्यांच्या पक्षाच्या पराभूत उमेदवाराने ठिय्या दिला आहे. राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांसह प्रभाग क्रमांक २७ च्या पराभूत उमेदवार (Candidate) आशा खरात व त्यांचे पती प्रशांत खरात यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

हे देखील वाचा : Nashik MC Election Result : नाशकात दिग्गजांना धक्का; ‘या’ बड्या नेत्यांना करावा लागला पराभवाचा सामना

दरम्यान, खरात यांनी फेर मतमोजणीची मागणी केली असता ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. त्यामुळे संतापलेल्या खरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन सुरु केले.तसेच पोलीस बळाचा वापर केल्यास सहकुटुंब आत्महत्या करण्याचा इशारा प्रशांत खरात यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ९ मे २०२६ – राजभवनाचा राजकीय अडथळा

0
तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालानंतर दक्षिण भारताच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. सुपरस्टार विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने १०८ जागा जिंकून तामिळनाडूच्या...