Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik MC News : स्वच्छ नाशिकसाठी महापालिकेची 'ग्राउंड ॲक्शन' मोहीम

Nashik MC News : स्वच्छ नाशिकसाठी महापालिकेची ‘ग्राउंड ॲक्शन’ मोहीम

सार्वजनिक जागेवर कचरा जाळला, थुकले, घाण केली… तर थेट दंड !

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील सर्व सहा विभागात दोन जणांचे १८ पथके तैनात केली आहेत. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, जाळणे, उघड्यावर शौच, धुंकणे, धूम्रपान, विलगीकरण न केलेला कचरा देणे अशा नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यातून ६२ दिवसांत २७.३१ लाखांची दंड वसुली झाली आहे.

- Advertisement -

शहर स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी नाशिक महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ अंतर्गत राबवलेली कठोर पण नियोजित मोहीम आता प्रत्यक्ष मैदानावर परिणाम दाखवू लागली आहे. महापालिकेने शहरातील प्रत्येक विभागात सहा कर्मचारी नियुक्त करून दोन-दोन जणांचे तीन स्वतंत्र पथक तयार केले आहे. ही पथके दररोज वेगवेगळ्या भागात ठराविक वेळेस उभी राहून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई (Action) करत आहेत.

डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन महिन्यांत एकूण ३,८६९ प्रकरणांवर कारवाई करत २७ लाख ३१ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये १,३१० प्रकरणांतून १२ लाख २० हजार ५०० तर जानेवारी २०२६ मध्ये २,५५९ प्रकरणांतून १५ लाख ११ हजार ३५० इतकी वसुली झाली. जानेवारीमध्ये नवीन नाशिक विभागात सर्वाधिक ६८० प्रकरणे नोंदली गेली असून तेथे ४ लाख ९७ हजार ९५० रुपये इतकी वसुली झाली. त्याखालोखाल सातपूर विभागात (Satpur Divison) ५६२ प्रकरणे व २,७८,५२०, तर पूर्व विभागात सातत्याने कारवाई झाली आहे.

याप्रमाणे दंड

पालापाचोळा, प्लास्टिक किंवा कचरा जाळल्यास पाच हजार तर सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास टाकल्यास पाच हजार रुपये सार्वजनिक ठिकाणी धुंकल्यास मोठ्या प्रमाणाला पंचवीस हजार रुपये दहा हजार रुपये उघडंधावर मैला रस्त्यावर घाण केल्यास १८० रुपये १५० रुपये उघड्यावर लघवी केल्यास २०० रुपये, तर उघड्यावर शौच केल्यास ५०० रुपये दंड आकारला जात आहे. विलगीकरण न केलेला कचरा दिल्यास पहिल्यांदा ३०० नंतर ५०० तर मोठ्या
प्रमाणात कचरा पाच हजार नंतर १५ हजार रुपये दंड करण्यात येत आहे.

ही मोहीम केवळ दंडासाठी नसून, शहराची स्वच्छता, आरोग्य आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आहे. मनपाच्या या शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सतत सुरू असलेल्या कारवाईमुळे नाशिक ‘स्वच्छ शहर’ म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकत आहे. नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.

अजित निकत, संचालक, घनकचरा विभाग, मनपा

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीची ‘सेफ हाऊस’ पॉलिटिक्स; शिवसेनेनंतर भाजपचेही...

0
नाशिक | Nashik स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीने (Mahayuti) आपल्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेचे (शिंदे...