Friday, May 31, 2024
HomeनाशिकNashik Road News : ड्रग्ज माफिया भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला नाशिकरोड...

Nashik Road News : ड्रग्ज माफिया भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला नाशिकरोड पोलीस घेणार ताब्यात

नाशिक रोड | प्रतिनिधी | Nashik Road

ड्रग तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना नाशिकरोड पोलीस ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणार आहे. ड्रग तस्करी प्रकरणी ड्रग माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील व त्याला मदत करणारा अभिषेक बलकवडे या दोघांना मंगळवारी पुणे पोलिसांनी नेपाळच्या सीमेवर अटक केल्यानंतर त्यांना पुण्यात आणले. परिणामी या दोघांना कोर्टात उभे केल्यानंतर न्यायालयाने १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे….

- Advertisement -

पुणे पोलिसांचा तपास संपल्यानंतर या दोघांना मुंबई पोलीस ताब्यात घेणारा असून त्यानंतर नाशिकरोड पोलीस भुषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना तपासासाठी ताब्यात घेणार आहे. दरम्यान ड्रग माफिया ललित पाटील याचे नाशिक शहरातील व नाशिक रोड परिसरातील विविध राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे सध्या राजकीय नेते सुद्धा अडचणीत आले आहे.

त्याचप्रमाणे पुणे पोलिसांनी अटक केलेले भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांच्याकडून पोलिसांना बरीच माहिती उघड होणार असून यामध्ये नाशिकरोड परिसरातील अनेक राजकीय नेत्यांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. भूषण पाटील हा उपनगर परिसरात तर अभिषेक बलकवडे हा देवळाली गाव परिसरात राहतो. ड्रग तस्करीसाठी या दोघांना कोण कोण मदत करत असत त्यांचीही नावे उघड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ललित पाटील याला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून सुद्धा मोठी माहिती मिळणार आहे. सध्या तो राहत असलेल्या उपनगर परिसरात पोलिसांची सारखी गस्त सुरू आहे. तसेच शनिवारी दुसऱ्या ड्रग कारखान्यावर नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्यातील तिघे आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांना त्यांच्याबाबत काही सुद्धा माहिती मिळत नसल्याचे समजते. त्यामुळे पोलीस करतात तरी काय असा सवाल नागरिक करत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या