Friday, July 24, 2026
HomeनाशिकNashik Mhada Fraud : पंचेचाळीस बिल्डरांचे भवितव्य टांगणीला!

Nashik Mhada Fraud : पंचेचाळीस बिल्डरांचे भवितव्य टांगणीला!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बहुचर्चित ‘म्हाडा’ भूखंड फसवणूक प्रकरणाचा तपास निर्णायक वळणावर येऊन ठेपला असून, आज सोमवारी (दि. २३) नाशिकच्या बांधकाम क्षेत्रासाठी ‘सुपर मंडे’ ठरणार आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार आणि ‘हॅप्पी होम’चा संचालक संशयित सोनू मनवानी याची पोलीस कोठडी आज संपत असून, दुसरीकडे अटकेच्या भीतीने धास्तावलेल्या ४५ हून अधिक बड्या बिल्डरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही आजच जिल्हा व सत्र न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

न्यायालयाच्या या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्यासह बिल्डर लॉबीसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (एलआयजी) राखीव असलेल्या शासकीय भूखंडांचे बेकायदेशीर तुकडे पाडून शासनाची आणि म्हाडाची कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सोनू मनवानी सध्या पोलीस कोठडीत आहे. मागील सुनावणीत पोलिसांनी या घोटाळ्याची व्याप्ती आंतरजिल्हा आणि अत्यंत क्लिष्ट असल्याचे सांगत सखोल तपासासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार मनवानीला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, पोलीस अधिक माहिती पदरात पाडून घेण्यासाठी कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनवानीसह इतरांबद्दल न्यायालयाचा निकाल काय येतो, यावरच या प्रकरणातील पुढील अटकसत्राची दिशा निश्चित होणार आहे.

बांधकाम क्षेत्रात भूकंपाची शक्यता

मनवानीच्या अटकेनंतर नाशिकच्या बांधकाम व्यवसायाचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर तब्बल ८४ बिल्डर आणि विकसक आहेत. त्यापैकी ४५ जणांनी अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. आज या सर्व अर्जावर एकत्रित सुनावणी होणार आहे. जर न्यायालयाने हे अर्ज फेटाळून लावले तर नाशिकमधील अनेकांना बेड्या ठोकण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

महत्त्वाची निरीक्षणे

  • या घोटाळ्यात केवळ बिल्डरच नव्हे, तर काही शासकीय अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचे नाव चर्चेत असल्याने तपासाला राजकीय वलय
  • अनेक संशयित सध्या ‘नॉट रिचेबल’ असून काहींनी शहराबाहेर पलायन केल्याची चर्चा
  • जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्यास तत्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी संशयितांचे वकील सज्ज

ताज्या बातम्या

पंचवटी

Nashik News: गोदावरीला पुराचा वेढा! पंचवटी व भांडी बाजारात पाणी शिरल्याने...

0
नाशिक | प्रतिनिधीजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य गंगापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर...