Saturday, May 9, 2026
Homeक्राईमNashik MHADA Fraud : तलाठ्यांच्या जबाबाने नायब तहसीलदाराची खुर्ची हलली; ३१ प्रकरणांत...

Nashik MHADA Fraud : तलाठ्यांच्या जबाबाने नायब तहसीलदाराची खुर्ची हलली; ३१ प्रकरणांत बनावट नकाशे बनवण्याचे दिले होते आदेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

म्हाडा जमीन फसवणूक घोटाळ्यात (MHADA Land Scam) अटकेत असलेला नायब तहसीलदार नितीन पाटील (Nitin Patil) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाटील याने आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांनाही गुन्ह्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, पाटीलच्या विरोधात चक्क दोन तलाठ्यांनीच पोलिसांकडे तोंड उघडले असून, त्यांनी दिलेल्या साक्षीमुळेच या घोटाळ्याचे धागेदोरे नायब तहसीलदारापर्यंत पोहोचल्याचे समोर येते आहे.

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहर पोलिसांच्या (Nashik City Police) तपासात दोन तलाठ्यांनी महत्त्वाचे जबाब नोंदवले आहेत. पाटील याने घोटाळ्यातील ४९ पैकी ३१ करून त्यांना मंजुरी दिली, असा जबाब या तलाठ्यांनी दिला आहे. या साक्षीमुळे नितीन पाटील विरोधात पोलिसांकडे भक्कम तांत्रिक पुरावे उपलब्ध झाले आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांचे पथक सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

दरम्यान, पाटीलच्या अटकेनंतर आता महसूल विभागातील इतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेतल्यानंतर नितीन पाटील सध्या पोलिस कोठडीत (Police Custody) आहे. बुधवारी (दि.६) त्याची कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.

भूमी अभिलेख रडारवर

नायब तहसीलदाराच्या एकट्याच्या सहीने हा घोटाळा होणे अशक्य नसल्याने, तहसीलदार आणि भूमी अभिलेख कार्यालयातील काही बडे अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या गुन्ह्यात यापूर्वी सोनू मनवानी आणि बांधकाम व्यावसायिक दीपक करमचंदानी यांना अटक झाली होती. पाटीलच्या अटकेनंतर आता प्रशासकीय वर्तुळातील इतर संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी वकिलांकडे धाव घेतली आहे.

घोटाळ्याचा घटनाक्रम

  • १६ मार्च: सोनू मनवानी याला अटक.
  • २३ एप्रिलः बांधकाम व्यावसायिक दीपक करमचंदानी गजाआड.
  • ३ मेः नायब तहसीलदार नितीन पाटीलला बेड्या.

ताज्या बातम्या

Nashik MHADA Land Scam : ‘बनावट कागदपत्रांचा कारखाना’; उपअधीक्षक बिपीन काजळे...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik म्हाडा जमीन फसवणूक घोटाळ्यात (Nashik Mhada Land Scam) भूमी अभिलेख विभागाचा उपअधीक्षक संशयित बिपीन काजळे हाच या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य...