Saturday, August 15, 2026
HomeनाशिकNashik Vidhan Parishad Election Result : मतमोजणीला सुरुवात; अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंनी...

Nashik Vidhan Parishad Election Result : मतमोजणीला सुरुवात; अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंनी विजयी होण्याचा केला दावा

नाशिक | Nashik

संपूर्ण राज्यात चर्चेत राहिलेल्या नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) मतमोजणीस (Vote Counting) आज (सोमवार) सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवाराच्या मोर्चेबांधणीमुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे.महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे व अपक्ष उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांच्यामध्ये चुरस असल्याने या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

सकाळी आठ वाजेला मतपेट्या मतदान केंद्रातून बाहेर आणल्या. त्यानंतर वैध मतांचे ५०-५० चे गठ्ठे तयार करण्याचे काम चालू आहे. तर भाजप बंडखोर गोकुळ गिते यांनी देखील मतमोजणीच्या ठिकाणी हजेरी लावली असून, त्यांनी मी विजयी होईल असा दावा केला आहे. तसेच मी प्रचार थांबवला होता तरी माझ्या यंत्रणेने काम केले आहे, त्यामुळे मला विजयाची खात्री आहे, असेही गिते यांनी म्हटले.

तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) म्हणाले की, महायुतीचा विजय निश्चित असून, उमेदवार मतमोजणी केंद्रावर येऊ शकतो यास माझी हरकत घेण्याचे काहीही कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या तीन उमेदवारांच्या नावाच्या बॉक्समध्ये ‘प्रथम पसंतीची’ मते टाकण्याचे काम सुरु आहे. जो उमेदवार पहिल्या फेरीत निश्चित कोटा पूर्ण करेल तो विजयी घोषित केला जाईल.

दरम्यान, तीन-तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाने निवडणुकीतून थांबण्याचा निर्णय जाहीर करणारे गोकुळ गीते यांनी प्रत्यक्ष मतमोजणी होण्याच्या काही मिनिटे अगोदर युटन घेत विजयाचा दावा केला आहे. या निवडणुकीत आपण कुठेही महायुतीच्या उमेदवाराला (Candidate) जाहीर पाठिंबा दर्शविलेला नाही. याचा पुनरुच्चार करत या निवडणुकीत आपण थांबलेलो होतो. मात्र, माझ्या प्रचार यंत्रणेने ही निवडणूक पुढे नेल्याने मला विजयाची खात्री आहे, असेही गोकुळ गीते म्हणले.

असे असेल विजयी मतांच्या कोट्याचे गणित

या निवडणुकीत एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ जणांनी मतदान केले आहे. विजयी उमेदवारासाठीचा कोटा निश्चित करण्याचे सूत्र खालीलप्रमाणे असेल. सध्याची स्थिती जर सर्व ६१८ मते वैध ठरली, तर त्याच्या ५० टक्के (309) अधिक १ म्हणजेच ३१० मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक असेल. अवैध मतांचा फरक : समजा मतमोजणी दरम्यान वरची १८ मते अवैध ठरली, तर एकूण वैध मते ६०० होतील. अशा स्थितीत ६०० च्या ५० टक्के (३००) अधिक १ म्हणजेच ३०१ मतांचा कोटा निश्चित केला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी वैध मतांवरूनच कोट्याची अंतिम निश्चिती होईल.

ताज्या बातम्या

संपादकीय : १५ ऑगस्ट २०२६ – लोकशाहीची नवी क्षितिजे

0
स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा टप्पा मागे सोडत आज देश आपल्या स्वातंत्र्याची ८० वर्षे पूर्ण करत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून मुक्त झालेला हा...