Saturday, May 30, 2026
HomeनाशिकNashik MNS News : 'हिंदीतच शिका' अरेरावीवर मनसे विद्यार्थी सेना आक्रमक; शिक्षकाच्या...

Nashik MNS News : ‘हिंदीतच शिका’ अरेरावीवर मनसे विद्यार्थी सेना आक्रमक; शिक्षकाच्या लगावली कानशिलात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) वतीने आज (बुधवारी) शहरातील एका कोचिंग क्लासमध्ये जाऊन परप्रांतीय शिक्षकांकडून मराठी विद्यार्थ्यांना अरेरावी होत असल्याचा आरोप करत जाब विचाण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, क्लासमधील बहुतांश शिक्षक परप्रांतीय असून, त्यांना मराठी येत नसल्याने विद्यार्थ्यांना (Students) अडचणी येत आहेत. काही शिक्षकांनी “हिंदीतच शिका, मराठीत शिकवणार नाही” अशी भूमिका घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.

यानंतर मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी (Worker) ही बाब अत्यंत गंभीर असून, महाराष्ट्रात मराठीची अवहेलना होत असल्याचे म्हटले. तसेच शिक्षक मराठी असावेत, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला. यावेळी शहराध्यक्ष ललित वाघ, उमेश भोई, नितीन धानापुणे, अक्षय कोंबडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...