Wednesday, February 5, 2025
HomeनाशिकNashik News : मनपा आयुक्त खत्रींचा दणका; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Nashik News : मनपा आयुक्त खत्रींचा दणका; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

आणखी काही रडारवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनपा आयुक्त म्हणून पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून कामांचा धडाका लावणाऱ्या मनपा आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी दोन दिवसांपूर्वी उद्यान अधिक्षकांना काम सुधारण्याचे अल्टीमेटम दिल्यानंतर बुधवारी रात्री अचानक बरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढल्याने मनपा (NMC) वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर आणखी काही विभाग रडारावर असल्याचे समजते.

- Advertisement -

बदल्यांमध्ये (Transferred ) नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, कनिष्ठ अभियंता किरण लोणे, घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश फ्लोड यांचा समावेश आहे. पगार यांची नाशिकरोड येथील पाणीपुरवठा विभागात तर लोणे बांना नवीन नाशिकमधील पाणी पुरवठा विभागात (Water Supply Department) पाठवण्यात आले. तर डॉ पलोड यांना पुन्हा वैद्यकीय विभागात जबाबदारी देण्यात आली आहे. आयुक्तांच्या या बदल्यांच्या धक्क्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे.

खत्री यांनी पदभार स्वीकारल्यापासून पालिकेतील कामकाज समजून घेण्याबरोचरच विभागवार आढावे घेत आहेत. दरम्यान त्यांनी अधिका-यांच्या बढ्या करत दणका दिला आहे. नगररचना विभागातील मनमानी कारभराविरोधातील अनेक तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या. कामे खोळंबून ठेवली जात असल्याचे बोलले जात होते. बांधकाम व्यावसायिकांनीही याप्रकरणी तक्रारी केल्या होत्या. महत्वाचे म्हणजे पगार अनेकदा कार्यालयात थांबतच नव्हते, बाहेरूनच कामकाज करायचे अशाही तक्रारी होत्या.

शिवाय विकास शुल्क कमी प्रमाणात बसूल होणे, संपर्कात नसणे, बांधकाम परवानगी रखडणे या तक्रारीची खत्री यांनी दखल घेत त्यांना हटवल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याजागी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन जाधव यांच्याकडे पदभार देण्यात आलाअसून जाधव यांनी आज (दि.९) गुरुवारी पदभारही हाती घेतला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांची पुन्हा वैद्यकीय विभागात बदली करण्यात आली आहे. डॉ. फ्लोडयांना हटवण्यामागे नेमके कारण समजू शकलेले नाही. फ्लोड यांच्या जागी पर्यावरण उपायुक्त अजित निकत यांची नियुक्ती केली असून त्यांनीही पदभार स्वीकारला आहे.

तत्कालीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर (Dr. Ashok Karanjkar) यांच्या काळात वादग्रस्त पंचावन्न कोटीच्या भूसंपादन प्रकरणात भूसंपादन विभागातील कनिष्ठ अभियंता किरण लोणे यांना हटवून त्यांची नवीन नाशिकमध्ये पाणी पुरवठा विभागात बदली केली आहे. लोगे यांनी परदेशवारी करताना आयुक्तांची परवानगी न घेता कार्यकारी अभियंता यांच्याकडे अर्ज सादर केला होता. त्यामुळेही लोगे वादात आल्याचे बोलले जात आहे. तर पंचावन्न कोटीच्या भूसंपादन प्रकरणात त्यांच्यावर शेतकऱ्यांनी गंभीर आरोप करत आक्रमक आंदोलन केले होते. नगरनियोजन चे शाखा अभियंता गोकुळ पगारे व भूसंपादनचे स. अभियंता आशीष भावसार यांच्याकडील पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त कार्यभार कमी करण्यात आला आहे.

उपायुक्त अनित निकत यांच्याकडे तीन चार्ज

पर्यावरण उपायुक्त अजित निकत यांच्याकडे घनकथरा संचालक पदाची जबाबदारी मनपा आयुक्तांनी दिली तर पर्यावरणाचा पद‌भार देखील त्यांच्याचकडे आहे. त्याचप्रमाणे मनपाचे कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार सुमारे एक महिना रजेवर जात आहे. त्यांचा प्रभारी पदभार देखील निकत यांच्याकडे देण्यात आल्याने निकत यांच्याकडे सध्या तीन महत्वाच्या जबाबदाऱ्याा आल्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या