Tuesday, July 2, 2024
HomeनाशिकNashik News : माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर बुलडोझर

Nashik News : माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर बुलडोझर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वसंत गीते (Vasant Gite) यांचे मुंबई नाका (Mumbai Naka) परिसरातील कार्यालय पाडण्यासाठी आज शनिवारी महापालिका अधिकारी जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक तसेच मोठा पोलीस फौजफाटा घेत दाखल झाले. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले असून सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराच्या दबावातून ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप गीते यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Majhi Ladki Bahin Yojana : योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेने (Nashik NMC) गीते यांच्या कार्यालयासह परिसरातील अतिक्रमणाबाबत नोटीस बजावली होती. येथे कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम नसून केवळ एक पत्र्याचे शेड आहे. तसेच हे काम राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत असल्याचे या नोटीसीत म्हटल्याचे बोलले जाते. त्यानंतर या कारवाईला माजी आमदार वसंत गीते यांच्या वतीने उच्च न्यायालयात (High Court) आव्हान देण्यात आले होते.मात्र, न्यायालयात अद्याप सुनावणी झाली नसताना आज ही कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nashik News : ग्रामीण पाेलिसांचे डाेंगर दऱ्यांतील हातभट्ट्यांवर छापे

तसेच या कारवाईच्या विरोधात गीते समर्थक आक्रमक झाले असून सत्ताधारी आमदाराचा निषेध असो,पन्नास खोके एकदम ओके, अशी घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच गीते यांच्या समर्थकांसह ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते देखील गीते यांच्या मुंबई नाका येथील परिसरात दाखल झाले आहेत.त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, भाजपच्या या आमदारांमध्ये आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भद्रकाली येथील मतदान केंद्रावर वाद झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर आजची ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या