Friday, January 23, 2026
HomeनाशिकNashik Municipal Corporation Election: मोठी बातमी! दिपक बडगुजर पाठोपाठ हर्षा बडगुजरांची माघार;...

Nashik Municipal Corporation Election: मोठी बातमी! दिपक बडगुजर पाठोपाठ हर्षा बडगुजरांची माघार; नविन नाशिक विभगात मोठा ट्विस्ट

नविन नाशिक | प्रतिनिधी
अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असतानाच नाशिकमध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला सुरुवात केली आहे. या दरम्यान, नविन नाशिक विभागात मोठी घडामोड घडली आहे. भाजपच्या उमेदवार हर्षा बडगुजर यांनी प्रभाग क्र. २५ मधून उमेदवारी मागे घेतली आहे.

Nashik Municipal Corporation Election: मोठी बातमी! भाजपचे उमेदवार दिपक बडगुजरांची माघार

- Advertisement -

नाशिक महानगरपालिका निवडणुकांची सध्या रणधुमाळी सध्या सुरु आहे. आज शुक्रवारी (दि. २ जानेवारी) रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत आहे. यादरम्यान, नविन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २५ क मधून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या हर्षा सुधाकर बडगुजर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता या प्रभागात २५ मधुन क गटातून भाग्यश्री ढोमसे व ड मधुन प्रकाश अमृतकर यांना भाजप पुरस्कृत करण्यात आल्याची घोषणा सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या