Friday, May 24, 2024
Homeनाशिक…अखेर नाशिक महापालिकेची महासभा रद्द

…अखेर नाशिक महापालिकेची महासभा रद्द

file photo

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

जगभरात थैमान घालणार्‍या करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र शासनाने चौथा लॉकडाऊन जारी केलेला असल्याने आणि राज्यातील बाधीतांचा आकडा वाढत आहे.

याच पार्श्वभूमीवर शहरात करोनाची स्थिती पाहता येत्या 20 मे रोजी महाकवि कालिदास कलामंदिरात बोलविण्यात आलेली महासभा महापौर सतिश कुलकर्णी यांनी रद्द केली आहे. दरम्यान महासभा घेण्यावरुन होत असलेले आरोप व आयुक्तांकडील निर्णय येण्यापुर्वीच महापौरांनी महासभा रद्द केल्यामुळे सत्ताधारी भाजपकडुन सारवासारव करण्यात आली आहे.

करोना संसर्गाचा देशाला मोठा फटका बसत असुन महाराष्ट्रातील बाधीतांचा आकडा दररोज वाढत आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा वाढता आकडा सर्वांसाठी चिंतेचा बनला आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने सभा, बैठका घेण्यास मनाई केलेली आहे.

असे असतांना गेल्या दोन महिन्यापासुन नझाल्याने कायदेशिर बाबी निर्माण होऊ नये म्हणुन महापौरांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून सामाजिक अंतराचा नियम पाळण्यासाठी कालिदास कलामंदीरात महासभा घेण्यासाठी परवानगी मागितली होती. यावर शिवसेनेने टिका केली होती. सध्याच्या करोनाच्या स्थितीत याप्रकारे सभा बोलविणे ही धोक्याची घंटा ठरु शकते. तेव्हा पंधरा दिवसांनी ही महासभा घेतली तरी काही फरक पडणार नाही.

मात्र महापौर, उपमहापौरांची पदे वाचविण्यासाठी महासभेचा आग्रह धरत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. तसेच शासनाने सभा, बैठका घेण्यास मनाई केलेली आहे, असे स्पष्ट करीत महासभा घेण्यासंदर्भातील निर्णय महापालिका आयुक्तांनी घ्यावा असे स्पष्ट करीत जिल्हाधिकार्‍यांनी आता निर्णयचा चेंडु आयुक्तांच्या कोर्टात टाकला होता.

यामुळे आयुक्तांकडुन महासभा घेण्यास परवानगी मिळणार नसल्याची चर्चा असतांना आज महापौरांनी उद्या(दि.20)ची जाहीर केलेली महासभाच रद्द केली आहे. आता ही महासभा 31 मे नंतरच घेतली जाणार असल्याची माहिती नगरसचिव विभागाकडुन देण्यात आली. घ्यावा लागणार आहे. यामुळे आता करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण पाहता आता आयुक्त महासभा घेण्यासंदर्भात काय निर्णय घेतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या