Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : सिटीलिंकमुळे मनपा तिजोरीत खडखडाट

Nashik News : सिटीलिंकमुळे मनपा तिजोरीत खडखडाट

साडेतीन वर्षांत २२० कोटी रुपये अदा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेने (Nashik NMC) जुलै २०२२ पासून सिटीलिंकद्वारे (Citylink Bus) शहर बससेवा सुरू केली आहे. मात्र, सुरूवातीपासून सतत तोट्यात ही बससेवा सुरु असून त्याची तूट भरून काढण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीवर मोठा भार येत आहे. आतापर्यंत महापालिकेने तब्बल २२० कोटी रुपये तूट म्हणून सिटी लिंक प्रशासनाला अदा केले आहे.मोठ्या प्रमाणात तोट्यात जर शहर बससेवा चालत असेल तर त्याच्यावर पुन्हा विचार करण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. तर फक्त ठेकेदारांना (Contractors) पोसण्यासाठीच बससेवा सुरू आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाचा (BJP) ड्रीम प्रोजेक्ट म्हणून शहर बससेवेकडे पाहिले जात होते, मात्र ती सतत तोट्यात सापडत असल्याने मनपासाठी तो पांढरा हत्ती बनत आहे. ८ जुलै २०२२ रोजी नाशिक शहर बस सेवा महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. सुरुवातीला ५० बसेस सुरू करण्यात आले व टप्याटप्याने सध्या २५० बसेस शहरातील विविध मार्गावर सुरू आहे तर त्याची व्याप्ती दरोज वाढत आहे. शहरातील २५ किलोमीटरपर्यंत बस जात असल्याने सिन्नर, भगूर आदी काही मार्गावर त्याचा चांगला उपयोग होत आहे. तर काही मार्गावर गाड्या रिकाम्या फिरत आहे. गरज नसतांना देखील बसेस सुरू राहत असल्याने तोट्यात भर पडत आहे.

२०२० मध्ये नाशिक महानगरपालिकेने नाशिकमधील (Nashik) बससे वे च्या खासगीकरणासाठी महाराष्ट्र सरकारला प्रस्ताव सादर केला होता. सध्या २५० बसेसपैकी २०० डिझेल तर ५० सीएनजी बस आहे. नाशिकरोड व तपोवन या दोन बस डेपोवरुन सेवा पुरवली जात आहे. दररोज हजारो प्रवासी घेऊन जातात. सिन्नर, दिंडोरी, सुकेणा, पिंपळगाव बसवंत, जातेगाव आदीदूरची शहरे सेवेचा भाग बनत आहेत. दरम्यान सततच्या संपामुळे नाशिककरांना नेहमी त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे तोट्यात चालणारी बससेवा फायद्यात आणण्यासाठी वेळोवेळी विविध योजना तयार करण्यात आल्या, मात्र त्यांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने तूटचा मोठा भार थेट मनपाच्या तिजोरीवर पडत आहे.दरवर्षी कोट्यवधी रुपये मनपा आपल्या तिजोरीत्न सिटीलिकला देत आहे. त्याचा परिणाम शहरातील इतर विकासकामांवर होतांना दिसत आहे.

नुकसानीचा शोध घेणे गरजेचे आहे

सिटीलिक प्रशासनाने काही अतिरिक्त बसेस घेऊन ठेवल्या आहेत. त्या रस्त्यावर धावल्या नाही. तरी ठेकेदाराला २५० किलोमीटरचे पैसे द्यावे लागतात. सिटीलिंक प्रशासनाने योग्य नियोजन करून उत्पन्न व खर्च यात बॅलन्स ठेवायला पाहिजे, नाशिककरांना चांगली सेवा मिळाली पाहिजे. मात्र, मनपाच्या तिजोरीवर त्याचा भार नको, नुकसानीचा शोध घेणे गरजेचे आहे. महामंडळ जेव्हा शहर बससेवा चालवत होती, ती प्रॉफिटमध्ये होती तर महापालिकेने घेतल्यावर ती लॉस मध्ये कशी काय जात आहे, याच्या शोध घेणे गरजेचे आहे.

सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख शिवसेना ठाकरे गट नाशिक

याप्रमाणे दिले पैसे

२१-२२ २५ कोटी
२२-२३ ५० कोटी
२३-२४ ७५ कोटी
२४-२५ (ऑक्टोबर २०२४ पर्यंत) ७० कोटी असे एकूण २२० कोटी मनपाने सिटीलिंकला दिले आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...